CLOSE AD

Post Office RD Scheme : पोस्टाची खास योजना ! फक्त 4200 रुपये गुंतवणूक केल्यास तुम्हाला मिळतील 3 लाख रुपये

Post Office RD Scheme : मंडळी तुम्ही सुरक्षित व ठराविक परतावा देणारी योजना गुंतवणुक करण्यासाठी शोधत असाल तर पोस्ट ऑफिस आरडी स्कीम हा एक चांगला पर्याय उपलब्ध आहे. यामध्ये तुम्ही दर महिन्याला पैसे गुंतवू शकतात. यामध्ये किमान 100 रुपये गुंतवता येऊ शकतात. यामध्ये कमाल मर्यादा नाही. पोस्ट ऑफिसमधील पैसे बुडत नाहीत कारण तो एक सरकारी विभाग आहे. तुम्हाला आरडी योजनेसाठी अकाउंट उघडायचं असेल तर त्यासाठी काय करावं लागेल, यांबद्दल जाणून घ्या अधिक माहिती.

आरडी स्कीम काय आहे ?

पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट स्कीमला लोक आरडी स्कीम या नावाने ओळखतात. तुम्ही यात दर महिन्याला पैसे जमा करू शकता. यावर चक्रवाढ पद्धतीने व्याज मिळते. आरडी मॅच्युअर झाल्यावर तुम्हाला चांगले रिटर्न मिळू शकतात. यामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना 6.70 टक्के व्याज मिळते. तुम्हाला आरडी स्कीमअंतर्गत प्री-मॅच्युअर अकाउंट क्लोजर व लोन या सुविधा दिल्या जातात.

आरडी स्कीमचा कार्यकाळ

पोस्ट ऑफिसची आरडी स्कीम नोकरदारांसाठी फायद्याची आहे. ते त्यांच्या पगारातील ठराविक रक्कम यामध्ये गुंतवू शकतात. या योजनेत तुम्ही पाच वर्षे गुंतवणूक करू शकतात, किमान 10 वर्षेही गुंतवणूक करता येऊ शकते. जितका कार्यकाळ मोठा, तितका परतावा अधिक मिळेल.

अकाउंट होऊ शकतं बंद

काही वेळा तुम्ही कोणत्याही कारणाने आरडीमध्ये पैसे जमा करू शकला नाहीत, जर तुम्ही सलग सहा महिने पैसे भरले नाही तर तुमचे अकाउंट बंद होऊ शकते. पण दोन महिन्यांच्या आत पैसे भरून तुम्ही अकाउंट पुन्हा सुरू करू शकता. सहा महिने पैसे जमा न केल्यास हे अकाउंट कायमस्वरुपी बंद केले जाऊ शकतं.

आरडी स्कीम अकाउंट कसं उघडायचं

आरडी स्कीमअंतर्गत पैसे जमा करायचे असतील तर जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जा. तिथे आरडी स्कीमचा रजिस्ट्रेशन अर्ज भरा, त्यामध्ये विचारलेली सगळी माहिती भरा.

त्यानंतर तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड, मोबाइल नंबर, पत्त्याचा पुरावा, दोन पासपोर्ट आकाराचे फोटो अर्जासोबत सादर करावे लागतात. हे सर्व पोस्ट ऑफिसमध्ये जमा करा, त्याबरोबर ठराविक रक्कम भरली की तुमचं अकाउंट सुरू होतं.

4200 रुपये जमा केल्यावर तीन लाख मिळतील

तुम्ही आरडीमध्ये पाच वर्षे महिन्याला 4200 रुपये जमा केले तर दोन लाख 52 हजार रुपये होतील. यानंतर गुंतवणूक केलेली रक्कम व व्याज मिळून दोन लाख 99 हजार 736 रुपये म्हणजेच जवळपास तीन लाख रुपये इतके पैसे मिळतील.

Leave a Comment