CLOSE AD

पोस्टाच्या योजनेत 2 लाखाची FD केल्यास किती परतावा मिळेल , जाणून घ्या सविस्तर माहिती

Post Office Fixed Deposit : नमस्कार मित्रांनो अलीकडेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) रेपो रेटमध्ये लक्षणीय कपात केली आहे. या निर्णयानंतर देशातील अनेक बँकांनी त्यांच्या फिक्स्ड डिपॉझिट (FD) योजनांवरील व्याजदर कमी केले आहेत. मात्र पोस्ट ऑफिसच्या एफडी योजनांचे व्याजदर अद्यापही स्थिर आहेत, आणि त्यामुळे या योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना निश्चितच चांगला परतावा मिळू शकतो.

पोस्ट ऑफिसद्वारे टाईम डिपॉझिट योजना राबवली जाते, जी स्वरूपाने बँकांच्या एफडी योजनांसारखीच असते. त्यामुळे ती पोस्ट ऑफिस एफडी योजना म्हणूनही ओळखली जाते.

फक्त राशन कार्ड दाखवा आणि मिळवा दरमहा 1000 रुपये

पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट योजना – वैशिष्ट्ये

ही योजना गुंतवणूकदारांसाठी सुरक्षित आणि फायदेशीर पर्याय ठरते. पोस्ट ऑफिस चार कालावधींसाठी एफडी सुविधा पुरवते – 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष आणि 5 वर्षे. या योजना पुढीलप्रमाणे व्याजदर प्रदान करतात.

  • 1 वर्षांची एफडी – 6.9% वार्षिक व्याज
  • 2 वर्षांची एफडी – 7.0% वार्षिक व्याज
  • 3 वर्षांची एफडी – 7.10% वार्षिक व्याज
  • 5 वर्षांची एफडी – 7.50% वार्षिक व्याज

विशेषता 5 वर्षांची एफडी योजना गुंतवणूकदारांसाठी अधिक आकर्षक ठरते, कारण ती जास्त व्याजदरासह करसवलतीचाही लाभ देते (80C अंतर्गत).

जनधन बँक खाते धारकांसाठी आनंदाची बातमी , पहा सविस्तर माहिती

5 वर्षांच्या पोस्ट ऑफिस एफडी योजनेत 2 लाख रुपयांवर मिळणारा परतावा

जर एखाद्या गुंतवणूकदाराने पोस्ट ऑफिसच्या 5 वर्षांच्या एफडी योजनेत ₹2,00,000 गुंतवले, तर त्याला 7.50% वार्षिक व्याजदरानुसार ₹89,990 इतके व्याज मिळेल. म्हणजेच एकूण रक्कम ₹2,89,990 होईल.

हा परतावा अनेक बँकांच्या सध्याच्या एफडी योजनांपेक्षा जास्त आहे, त्यामुळे पोस्ट ऑफिस एफडी योजना अधिक फायदेशीर पर्याय ठरते.

सध्याच्या कमी व्याजदराच्या वातावरणातही, पोस्ट ऑफिसच्या एफडी योजना सुरक्षित आणि स्थिर परतावा देणाऱ्या योजना म्हणून टिकून आहेत. कमी जोखमीसह चांगला व्याजदर मिळवायचा असेल, तर ही योजना निश्चितच योग्य निवड ठरू शकते.

Leave a Comment