अर्ज करण्याची पद्धत
या योजनेसाठी अर्ज ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने करता येतो. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी https://pmmvy.wcd.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागते. तेथे Citizen Login वर क्लिक करून मोबाइल नंबर टाकून OTP द्वारे लॉगिन करावे. त्यानंतर अर्ज फॉर्म भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करून सबमिट करावा. अर्ज सादर केल्यानंतर नोंदणी क्रमांक मिळतो, जो भविष्यासाठी जतन करावा. ऑफलाइन अर्जसाठी जवळच्या आंगणवाडी केंद्र किंवा आरोग्य केंद्रात जाऊन फॉर्म भरून कागदपत्रांसह जमा करता येतो. फॉर्म जमा केल्यावर पावती मिळते, ती सुरक्षित ठेवावी.
इलेक्ट्रिक ट्रॅक्टर खरेदीवर 1.5 लाखाचे अनुदान , जाणून घ्या सविस्तर माहिती
प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना 2025 ही गरीब आणि गरजू गर्भवती महिलांसाठी एक उपयुक्त योजना आहे. योजनेचा लाभ घेतल्यास महिलांना गर्भधारणेदरम्यान आवश्यक पोषण, वैद्यकीय तपासणी आणि विश्रांती मिळते, ज्यामुळे बाळ आणि आई दोघांचेही आरोग्य सुधारते. पात्र महिलांनी या योजनेचा लाभ घेऊन नोंदणी करणे आवश्यक आहे.