CLOSE AD

पीएम किसान योजना : या तारखेला जमा होणार पीएम किसान योजनेचा 20 वा हप्ता

मंडळी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी (PM-KISAN) योजनेअंतर्गत २०वा हप्ता कधी जमा होणार, याबाबत शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता आहे. यावर्षी पावसाने उशिरा हजेरी लावल्यामुळे काही भागांत पेरण्या झाल्या असल्या, तरी अनेक ठिकाणी त्या रखडल्या आहेत. काही भागांत दुबार पेरणीचे संकटही उभे आहे. अशा कठीण काळात, निदान दोन हजार रुपयांचा आर्थिक आधार मिळेल या आशेने शेतकरी केंद्र सरकारच्या पुढील हप्त्याची वाट पाहत आहेत.

सोन्याच्या दरात आज झाले मोठे बदल , जाणून घ्या आजचे सोन्याचे दर

२०वा हप्ता नेमका कधी जमा होणार?

पूर्वी असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता की, जूनच्या अखेरीस हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल. मात्र अजूनही तो जमा झालेला नाही. याच दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी १८ जुलै रोजी बिहारच्या मोतीहारी येथे एका सभेला उपस्थित राहणार आहेत. त्या दिवशी डिजिटल माध्यमातून पीएम किसान योजनेचा २०वा हप्ता जारी केला जाऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र अद्याप केंद्र सरकारकडून यासंबंधी कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

तुमचं नाव लाभार्थी यादीत आहे का? अशा पद्धतीने करा तपासणी

1) https://pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जा.
2)!Farmer Corner या पर्यायावर क्लिक करा.
3) Beneficiary List निवडा.
4) तुमचा आधार क्रमांक किंवा खाते क्रमांक टाका.
5) Get Data वर क्लिक करून स्टेटस तपासा.

जर ई-केवायसी पूर्ण झाली असेल आणि आधार क्रमांक खात्याशी लिंक असेल, तर रक्कम थेट खात्यात जमा होते. या प्रक्रियेत अडचण आल्यास, शेतकरी खालील हेल्पलाईन नंबरवर संपर्क करू शकतात.

काय आहे पोस्ट ऑफिसची RD योजना ? जाणून घ्या सविस्तर माहिती

  • PM-KISAN हेल्पलाईन — 1800-115-5525
  • इतर हेल्पलाईन — 155261 / 011-24300606

एकाच कुटुंबातील एकालाच लाभ

केंद्र सरकारने या योजनेच्या नियमांमध्ये महत्त्वाचा बदल केला आहे. यानुसार, एका कुटुंबातील (पती, पत्नी, मुलगा, मुलगी) फक्त एक सदस्यच या योजनेचा लाभ घेऊ शकतो. इतर सदस्यांना योजनेपासून वंचित राहावे लागेल. या निर्णयामुळे फसवणूक टाळून खर्‍या लाभार्थ्यांपर्यंत निधी पोहोचवण्याचा सरकारचा उद्देश आहे.

हप्ता कधी जमा होतो आणि तुम्हाला त्याचा लाभ मिळतो का, हे वेळोवेळी वेबसाईटवर तपासत राहा. योग्य कागदपत्रे आणि अपडेटेड माहिती असल्यास तुमचा हप्ता खात्यात वेळेवर जमा होईल.

Leave a Comment