PM Aawas Yojana : मित्रांनो PM आवास योजना ग्रामीण 2025 ही भारत सरकारची एक महत्त्वाची कल्याणकारी योजना आहे. या योजनेचा उद्देश ग्रामीण भागातील गरजू व गरीब कुटुंबांना स्वतःचं पक्कं घर बांधण्यासाठी आर्थिक मदत देणे हा आहे. या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना घर बांधण्यासाठी एकूण 1.20 लाख ते 1.30 लाख रुपयांपर्यंतचे अनुदान सरकारकडून दिले जाते. त्याचबरोबर, जर लाभार्थ्यांनी होम लोन घेतले असेल तर त्यावर व्याज सवलतीचा लाभही मिळतो.
सरकारने PM आवास योजना ग्रामीण लाभार्थी यादी 2025 जाहीर केली असून, अनेक लाभार्थ्यांची नावे या यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत. तुम्ही या योजनेसाठी अर्ज केला असेल, तर आता तुम्ही तुमचं नाव ऑनलाइन यादीत आहे का हे सहज तपासू शकता.
सरकारतर्फे 100 शेळ्या आणि 5 बोकड घेण्यासाठी मिळणार 10 लाख रुपयांचे अनुदान , आजच करा अर्ज
प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना म्हणजे काय?
ही योजना केंद्र सरकारकडून ग्रामीण भागात राहणाऱ्या गरीब व कच्च्या घरात राहणाऱ्या कुटुंबांसाठी सुरू करण्यात आली आहे. योजनेचा मुख्य हेतू प्रत्येक गरजू कुटुंबाला सुरक्षित, स्वच्छ आणि पक्कं घर उपलब्ध करून देणे हा आहे.
मैदानी भागातील लाभार्थ्यांना 1,20,000 रुपये तर डोंगरी किंवा उंच भागात राहणाऱ्या लाभार्थ्यांना 1,30,000 रुपये इतकी रक्कम दिली जाते. ही रक्कम 3 ते 4 हप्त्यांमध्ये थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा केली जाते.
फक्त 1 लाख रुपये गुंतवा आणि मिळवा दरमहा 6500 रुपये , पहा सविस्तर माहिती
या योजनेचे मुख्य फायदे असे आहेत
गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना पक्कं घर बांधण्यासाठी सरकारकडून थेट आर्थिक मदत दिली जाते. योजनेतून लाभ घेणाऱ्या व्यक्तींना होम लोनवर व्याज सवलत देखील मिळते. सगळ्या रक्कमा थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा होतात, त्यामुळे पारदर्शकता टिकते. शिवाय लाभार्थ्यांची यादी खुली जाहीर केली जाते.
पात्रता अटी काय आहेत?
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार ग्रामीण भागातील कायमस्वरूपी रहिवासी असणे आवश्यक आहे. त्याचं घर कच्चं किंवा अर्धपक्कं असावं, उदा. मातीच्या भिंती असलेलं घर किंवा टिनची छप्पर असलेलं घर. अर्जदाराचे नाव 2011 च्या SECC यादीत असणे आवश्यक आहे. अर्जदार बीपीएल यादीत किंवा अल्प/निम्न उत्पन्न गटात असावा. तसेच, अर्जदाराने सरकारी नोकरी करत नसावे किंवा तो करदाते नसावा.
मनरेगा योजनेखाली मिळणार मोफत सायकल ! असा करा ऑनलाईन अर्ज
यादीत नाव आल्यावर पुढे काय करायचं?
जर यादीत तुमचं नाव असेल, तर पहिल्या हप्त्याची रक्कम लवकरच तुमच्या खात्यात जमा होईल. त्यानंतर तुम्ही घर बांधण्याची तयारी सुरू करू शकता. पुढील हप्ते आणि रक्कम कधी मिळणार आहे हे नियमितपणे पोर्टलवर लॉगिन करून तपासता येते.
👇👇👇👇👇👇
लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
👆👆👆👆👆👆
लाभार्थ्यांसाठी काही उपयुक्त सूचना
योजनेसाठी अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे अचूक आणि पूर्ण द्यावीत. यात आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला, घराच्या स्थितीचे फोटो इत्यादींचा समावेश होतो. जर यादीत तुमचं नाव नसेल, तर संबंधित ग्रामसेवक किंवा पंचायत कार्यालयाशी संपर्क करा. तसेच, अर्ज क्रमांक जपून ठेवा कारण त्याच्या आधारे तुम्ही तुमची अर्ज स्थिती वेळोवेळी तपासू शकता.