Next 4 Days High Alert : मित्रांनो हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी ३ जुलै ते ८ जुलै या कालावधीतील पावसाचा अंदाज वर्तवला आहे. राज्यातील विविध भागांत पावसाचे प्रमाण वेगवेगळे राहणार असून काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल, असे त्यांनी सांगितले आहे.
३ ते ४ जुलै दरम्यान पावसाची शक्यता
डख यांच्या अंदाजानुसार ३ ते ४ जुलैदरम्यान विदर्भ आणि मराठवाडा भागात पावसाचा जोर राहणार आहे. कोकणात पावसाचे वातावरण सुरूच राहील. मध्य महाराष्ट्रातील शेतकरी पावसाची प्रतीक्षा करत असून या काळात पावसामुळे पिकांना जीवनदान मिळेल असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.
फक्त राशन कार्ड दाखवा आणि मिळवा दरमहा 1000 रुपये
५ ते ८ जुलै दरम्यान पावसाचे वातावरण
राज्यात ५ ते ८ जुलै दरम्यान पुन्हा पावसाचे वातावरण तयार होईल आणि वेगवेगळ्या भागांत पावसाचा जोर अनुभवायला मिळेल. विदर्भातील नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, वाशीम, यवतमाळ, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांत पाऊस जास्त प्रमाणात होईल. मराठवाड्यात परभणी, हिंगोली, नांदेड, जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांतही चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात देखील पावसामुळे पिकांना फायदा होईल.
विदर्भात जास्त पावसाचा अंदाज
पंजाबराव डख यांनी सांगितले की यंदा विदर्भात पावसाचा जोर अधिक राहील. मराठवाड्यातही समाधानकारक पाऊस होण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील सोलापूर, अहमदनगर आणि इतर पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या जिल्ह्यांतही येत्या काही दिवसांत पिकांना उपयुक्त असा पाऊस पडेल.
जनधन बँक खाते धारकांसाठी आनंदाची बातमी , पहा सविस्तर माहिती
शेतकऱ्यांना दिलेला सल्ला
पंजाबराव डख यांनी शेतकऱ्यांना सल्ला दिला आहे की, सोयाबीन पिकात तननाशक किंवा कोळपणी न करता खुरपणी करावी. खुरपणी केल्यास सोयाबीनला चांगला उतार मिळतो आणि उत्पादनात वाढ होते, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.