CLOSE AD

हवामान खात्याचा नवीन अंदाज : हे जिल्हे झोडपून काढणार !

New Weather Update : मित्रांनो गेल्या काही दिवसांपासून राज्यभर पावसाचा जोर तुलनेने कमी झालेला दिसून येत आहे. आज देखील राज्याच्या बहुतांश भागांत पावसाचा जोर कमी राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. मात्र कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथा परिसरात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

कोकणातील रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागानुसार या जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. काल दुपारनंतर या भागांत पावसाने जोरदार हजेरी लावली असून शेतकऱ्यांना त्यामुळे दिलासा मिळाला आहे.

या महिलांना मिळणार मोफत पिठाची गिरणी , असा करा अर्ज

रत्नागिरी जिल्ह्यात रात्रीभर पाऊस पडत होता, मात्र पहाटेपासून पावसाचा जोर कमी झाला असून आता केवळ जोरदार सरी पडत आहेत. सुदैवाने अद्याप पावसाचा जनजीवनावर फारसा विपरीत परिणाम झालेला नाही. भात लावणीच्या कामांना मात्र पावसामुळे चांगला वेग मिळणार आहे.

महाराष्ट्रातील इतर भागांचा आढावा

  • पश्चिम महाराष्ट्र — पुणे, कोल्हापूर आणि सातारा घाटमाथ्यावरही पावसाचा जोर राहणार असून येथे ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. इतर भागांत हलक्यापासून मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.
  • मराठवाडा — छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे.
  • उत्तर महाराष्ट्र— नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. नाशिकच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून येथे यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
  • विदर्भ — अकोला, अमरावती, भंडारा आणि बुलढाणा जिल्ह्यांत विजांसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

फक्त एकदा गुंतवणूक करून करू शकता बक्कळ कमाई ! पहा सविस्तर माहिती

पुण्यात पावसाचा जोर

गेल्या काही दिवसांत पुणे परिसरात पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र काल रात्री पुणे शहर आणि परिसरातील घाटमाथ्यावर पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे खडकवासला धरणातून 6451 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आला असून पावसाच्या तीव्रतेनुसार विसर्गाचे प्रमाण कमी-जास्त केले जाणार आहे, अशी माहिती पाटबंधारे विभागाने दिली आहे.

हवामान विभागाचे नागरिकांना आवाहन

राज्यात काही भागांत पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.

Leave a Comment