CLOSE AD

लाडकी बहीण योजना : जून महिन्याच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट ….

Ladki Bahin Yojana June Update : मंडळी महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरू करण्यात आलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या पुन्हा चर्चेत आहे. या योजनेच्या लाभाची प्रतिक्षा करणाऱ्या लाखो महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारने निधीची अडचण दूर करून जून महिन्याच्या सन्मान निधीचे वितरण सुरू केले आहे.

जून महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यांमध्ये जून महिन्याचा सन्मान निधी जमा होण्यास सुरुवात झाली आहे. निधीच्या कमतरतेमुळे हप्ता वितरित करण्यात उशीर झाला होता, मात्र अनुसूचित जातीसाठी मंजूर झालेल्या ४१० कोटी ३० लाख रुपयांमुळे ही अडचण दूर झाली आहे.

सोन्या चांदीच्या दरात आज मोठी वाढ , जाणून घ्या आजचे नवीन दर

जुलैचा हप्ता कधी मिळणार?

सुरुवातीला चर्चा होती की जून आणि जुलै महिन्याचा हप्ता एकत्र दिला जाईल. मात्र आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे की सध्या फक्त जून महिन्याचा हप्ता वितरित होत आहे आणि जुलैचा हप्ता ऑगस्ट महिन्यात दिला जाईल.

अपात्र लाभार्थ्यांवर कारवाई

योजनेत पारदर्शकता ठेवण्यासाठी राज्य सरकारने कठोर पावले उचलली आहेत. अलीकडील तपासणीत २,२८९ शासकीय महिला कर्मचारी अपात्र असूनही या योजनेचा लाभ घेत असल्याचे आढळले. या महिलांना योजनेतून वगळण्यात आले असून अपात्र लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळू नये म्हणून सरकारकडून सातत्याने तपासणी सुरू आहे.

विद्यार्थ्यांना 10,000 रुपये शिष्यवृत्ती मिळविण्याची संधी , पहा सविस्तर माहिती

योजनेचे उद्दिष्ट

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेतून पात्र महिलांना दर महिन्याला आर्थिक मदत थेट बँक खात्यात जमा केली जाते. यामुळे महिलांना त्यांच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी मोठा आधार मिळतो.

पात्रता निकष

या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही महत्त्वाचे पात्रता निकष आहेत. लाभार्थी महिला २१ ते ६० वयोगटातील असावी, महाराष्ट्रातील कायमस्वरूपी रहिवासी असावा आणि तिच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५ लाख रुपयांपेक्षा कमी असावे.

लाभार्थ्यांसाठी सूचना

राज्य सरकारने लाभार्थ्यांना आपली आधार लिंक केलेली बँक खाती तपासण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून सन्मान निधी मिळाल्याची खात्री होऊ शकेल.

Leave a Comment