CLOSE AD

लाडकी बहीण योजना : लाडक्या बहिणींचा हप्ता जमा झाला का ? लगेच चेक करा

Ladki Bahin Yojana June : मित्रांनो राज्य सरकारने सुरू केलेली लाडकी बहीण योजना ही सध्या राज्यातील लाखो महिलांसाठी आशेचा किरण ठरत आहे. या योजनेच्या माध्यमातून सरकार प्रत्येक पात्र महिलेला दर महिन्याला १५०० रुपयांचा थेट आर्थिक लाभ त्यांच्या खात्यात जमा करत आहे. विशेषता आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांसाठी ही योजना मोठा आधार ठरत आहे.

सध्या जून महिना संपण्याच्या अगदी उंबरठ्यावर आहे, आणि अजूनही योजनेचा हप्ता जमा झाला की नाही, याबाबत अनेक महिलांमध्ये संभ्रम आणि चिंता निर्माण झाली आहे. यामुळे हप्ता केव्हा जमा होणार, आणि तो कसा तपासायचा, याविषयी माहिती असणे महत्त्वाचे आहे.

गाय म्हैस शेळी साठी मिळणार इतके अनुदान , असा करा ऑनलाईन अर्ज

हप्ता जमा होण्यास विलंब – सरकारकडून अद्याप स्पष्टता नाही

जून महिन्याचा हप्ता मिळण्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या महिलांसाठी सध्या काहीशी अनिश्चितता आहे. राज्य सरकारने अद्याप अधिकृतपणे हप्त्याच्या जमा होण्याची तारीख जाहीर केलेली नाही. त्यामुळे लाभार्थी महिलांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.

मात्र मागील काही महिन्यांचा विचार केला, तर सरकारकडून निधी थेट खात्यात अचानकपणे कोणतीही पूर्वसूचना न देता जमा करण्यात येतो. त्यामुळे ज्या महिलांनी या योजनेसाठी नोंदणी केली आहे, त्यांनी आपले बँक खाते नियमितपणे तपासणे आवश्यक आहे.

10 वी पास विद्यार्थ्यांना मिळणार मोफत टॅबलेट , असा करा अर्ज

पैसे जमा झालेत का? – ऑनलाईन तपासणीची सोपी पद्धत

1) तुमच्या बँकेच्या किंवा पोस्ट ऑफिसच्या अधिकृत मोबाइल अ‍ॅपमध्ये लॉगिन करा.
2) त्यानंतर चेक बॅलन्स किंवा अकाऊंट स्टेटमेंट या पर्यायावर क्लिक करा.
3) तुमच्या खात्यात जर ₹1500 ची रक्कम जमा झाली असेल, तर ती रक्कम तिथे स्पष्टपणे दिसून येईल.
4) तसेच ट्रान्झॅक्शन हिस्ट्री किंवा व्यवहार तपशील या पर्यायातून पैसे कोणत्या दिवशी जमा झाले हेही सहज समजू शकते.

ऑफलाईन पद्धतीने हप्ता कसा तपासावा?

ज्या महिलांकडे स्मार्टफोन नाही किंवा इंटरनेटचा वापर शक्य नाही, त्यांच्यासाठी बँकेची ऑफलाईन सेवा उपयुक्त ठरू शकते. यासाठी तुम्ही जवळच्या बँक शाखेत भेट द्या.

PM किसानच्या 20 व्या हप्त्याला उशीर होणार ? पहा सविस्तर माहिती

तेथे तुमचे पासबुक अपडेट करून घ्या. जर ₹1500 क्रेडिट अशी नोंद पासबुकमध्ये दिसली, तर समजावे की लाडकी बहीण योजनेचा हप्ता तुमच्या खात्यात जमा झाला आहे.

जर रक्कम जमा झाली नसेल, तर काही दिवसांनी पुन्हा तपासणी करावी लागेल. तसेच खाते क्रियाशील आहे ना, त्यात आधार नंबर लिंक आहे का, याचाही एकदा नक्की तपास करणे आवश्यक ठरते.

लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांनी संयम बाळगणे गरजेचे आहे. योजनेतून मिळणारा निधी कधीही खात्यात जमा होऊ शकतो, यासाठी नियमितपणे खात्याची तपासणी करत राहणे आवश्यक आहे. तसेच अडचण आल्यास संबंधित ग्रामपंचायत, महिला आणि बालकल्याण कार्यालय किंवा बँकेशी संपर्क साधावा.

Leave a Comment