CLOSE AD

लाडकी बहीण योजना : लाडक्या बहिणींना जून आणि जुलै महिन्याचा हप्ता एकत्रित मिळणार ?

Ladki Bahin Yojana Installment : मंडळी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारकडून राबवण्यात येणारी एक महत्त्वाची योजना असून ती महिलांसाठी आर्थिक आधार ठरली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा ₹1500 आर्थिक मदत दिली जाते, म्हणजेच वार्षिक एकूण ₹18,000. आतापर्यंत या योजनेचे 11 हप्ते पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत.

मे पर्यंतचे हप्ते जमा, जूनची प्रतीक्षा

सदर योजनेअंतर्गत जुलै 2024 ते मे 2025 पर्यंतचे हप्ते नियमितपणे वितरित करण्यात आले आहेत. मे महिन्याचा हप्ता जूनच्या सुरुवातीला वितरित झाला होता. मात्र, सध्या जून महिना संपण्याच्या काहीच दिवस आधी असतानाही महिलांच्या खात्यावर जून महिन्याचा हप्ता जमा झालेला नाही. त्यामुळे अनेक महिलांमध्ये उत्सुकता आणि संभ्रम निर्माण झाला आहे.

महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी , जाणून घ्या सविस्तर माहिती

जून आणि जुलैचा हप्ता एकत्र येणार का?

सरकारकडून यासंदर्भात कोणतीही अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नसली, तरी काही प्रसारमाध्यमांमध्ये असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे की, जून आणि जुलै महिन्यांचे हप्ते एकत्रितपणे जुलैमध्ये जमा होऊ शकतात. अशा परिस्थितीत लाभार्थींना एकाचवेळी ₹3000 रुपये मिळण्याची शक्यता आहे.

याआधीही एकत्रित हप्ते मिळाले आहेत

महत्वाचे म्हणजे, यापूर्वीही काही प्रसंगी या योजनेचे दोन हप्ते एकत्रित देण्यात आलेले आहेत. त्यामुळे यावेळीही अशी शक्यता नाकारता येत नाही. मात्र यासंदर्भात सरकारकडून कोणतीही स्पष्टता अद्याप मिळालेली नाही.

Fact Check : या विद्यार्थ्यांना मिळतंय मोफत टॅबलेट , असा करा अर्ज

लाभार्थींमध्ये सकारात्मक अपेक्षा

या चर्चेमुळे अनेक महिलांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. सरकारकडून लवकरच यावर अधिकृत खुलासा करण्यात येईल, अशी अपेक्षा आहे. जर दुहेरी हप्ता मिळाला, तर महिलांना आर्थिकदृष्ट्या दिलासा मिळणार आहे.

माझी लाडकी बहीण योजना हे राज्यातील महिलांसाठी एक महत्त्वाचे आर्थिक पाठबळ ठरले आहे. योजनेतील पुढील अपडेट मिळताच आम्ही तुम्हाला तत्काळ माहिती देऊ. तोपर्यंत महिलांनी अधिकृत माहितीची प्रतीक्षा ठेवावी, ही विनंती.

Leave a Comment