Ladki Bahin Yojana Breaking News : मंडळी राज्यातील महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली लाडकी बहीण योजना’म सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. सरकारने निवडणुकीपूर्वी या योजनेतील मासिक हप्ता ₹1500 वरून ₹2100 करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र सरकार स्थापन होऊन सहा महिन्यांहून अधिक काळ उलटून गेला तरी या आश्वासनाची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे लाभार्थी महिलांमध्ये नाराजी आणि संभ्रमाचे वातावरण आहे.
विहीर खोदण्यासाठी सरकार देतंय 5 लाख रुपये ! असा करा ऑनलाईन अर्ज
मुख्यमंत्री आणि महसूल मंत्र्यांचे स्पष्टीकरण
या विषयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की, त्यांनी दिलेले वचन ते विसरलेले नाहीत. राज्याची आर्थिक स्थिती हळूहळू सुधारत असून लवकरच वाढीव हप्ता म्हणजेच ₹2100 देण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल.
त्याचबरोबर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही याच आशयाचे वक्तव्य करत लाडकी बहीण योजनेचा हप्ता ₹2100 केला जाईल असे जाहीर केले. मात्र या वाढीव हप्त्याची अंमलबजावणी नेमकी कधीपासून केली जाईल, याची ठोस तारीख अद्याप सरकारकडून जाहीर करण्यात आलेली नाही.
प्रधानमंत्री पीक विमा योजना : पीक विमा योजनेत झाले मोठे बदल , जाणून घ्या सविस्तर माहिती
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या घोषणा
महसूल मंत्री बावनकुळे यांनी शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वपूर्ण घोषणा केल्या आहेत. त्यामध्ये सर्वसामान्य आणि गरजू शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी जाहीर करण्यात आली आहे. शेतातील पंपांसाठी वापरण्यात येणाऱ्या वीजेचे बिल पुढील पाच वर्षांसाठी माफ करण्यात येणार आहे.
तसेच घरगुती वीज दरामध्ये कपात करत ₹8.20 प्रति युनिट दर थेट ₹6 वर आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अमरावती जिल्ह्यातील पांधन रस्त्यांसाठी विशेष निधी देण्याचेही आश्वासन देण्यात आले असून त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी चांगले रस्ते उपलब्ध होतील.
पंतप्रधान कौशल्य विकास योजना : सरकारी मोफत ट्रेनिंग घ्या आणि नोकरी मिळवा !
लाडकी बहीण योजनेचा वाढीव हप्ता मिळवण्यासाठी महिलांना अजून प्रतीक्षा करावी लागणार आहे. सरकारकडून घोषणांचे पडसाद उमटत असले तरी प्रत्यक्षात अंमलबजावणीबाबत स्पष्टता नसल्यामुळे महिलांमध्ये नाराजी आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांसाठी करण्यात आलेल्या घोषणांमुळे काहीसा दिलासा मिळाला आहे.