Ladki Bahin Yojana : मित्रांनो लाडकी बहिणींचा जून 2025 चा हप्ता कधी मिळणार? असा प्रश्न राज्यभरातील अनेक महिलांना सतावतो आहे. यासंदर्भात सरकारकडून अपडेट माहिती देण्यात आली आहे. सध्या जून महिना संपायला अवघे 3-4 दिवस शिल्लक असताना, जून आणि जुलै या दोन्ही महिन्यांचे एकत्रित 3,000 रुपये खात्यात जमा होतील का, याविषयी महिलांमध्ये उत्सुकता आहे. या लेखाद्वारे आपण हप्त्याच्या वितरणासंबंधी सर्व माहिती जाणून घेऊया.
महिला स्टार्टअप योजना सुरु , 25 लाखापर्यंत कर्ज मिळणार ……..
आतापर्यंतचा हप्त्यांचा आढावा
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत पात्र महिलांच्या खात्यात आतापर्यंत 11 हप्ते जमा झाले आहेत. आता महिलांना 12व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. जून महिना संपत आला असताना सरकारकडून हप्त्याची अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही. मात्र महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी लवकरच हप्ता जमा केला जाईल, असे सांगितले आहे.
मे महिन्याचा हप्ता जमा करताना अर्ज तपासणी प्रक्रियेमुळे उशीर झाला होता. त्याचप्रमाणे जून हप्त्यासाठीही निधी हस्तांतरण प्रक्रियेची पूर्तता होणे आवश्यक आहे.
सरकारकडून मोफत भांडी संच मिळविण्यासाठी असा करा अर्ज
हप्ता जमा प्रक्रिया
राज्याचा अर्थ विभाग आणि अर्थमंत्री यांच्यामार्फत निधी महिला व बाल विकास विभागाकडे हस्तांतरित केला जातो. त्यानंतर हा निधी बँकेच्या संयुक्त खात्यावर जमा केला जातो आणि पुढे पात्र महिलांच्या खात्यात जमा होतो. निधी हस्तांतराच्या अधिसूचनेनंतर 2-3 दिवसांत हप्ता खात्यात जमा होतो.
अर्ज तपासणी व विलंबाचे कारण
अलीकडे गट क आणि गट ड मधील काही सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी अटींचे उल्लंघन करून लाभ घेतल्याचे आढळल्यामुळे राज्यभर अर्जांची पुन्हा तपासणी सुरू आहे. सुमारे आठ लाख अर्जांची तपासणी प्रलंबित आहे. त्यामुळेच मे आणि जून महिन्याच्या हप्त्यात विलंब झाला आहे. ही प्रक्रिया पूर्ण होताच हप्ता जमा होईल.
या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार 4000 रुपये , पहा सविस्तर माहिती
नवीन अर्ज प्रक्रिया
लाडकी बहीण योजनेचे नवीन अर्ज 2024 मध्ये बंद झाले आहेत. त्यामुळे अनेक पात्र महिलांना अर्ज करता आलेला नाही. महिलांकडून नवीन अर्ज प्रक्रिया लवकर सुरू करावी अशी मागणी होत आहे. यावर मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की शासनस्तरावर निर्णय झाल्यानंतरच नवीन अर्ज प्रक्रिया सुरू होईल आणि अधिकृत संकेतस्थळावर अर्ज खुल्या होतील.
अधिकृत संकेतस्थळ —https://ladakibahin.maharashtra.gov.in
टीप — अधिकृत अधिसूचना किंवा हप्ता जमा तारखेची माहिती मिळताच आपण अधिकृत संकेतस्थळ किंवा स्थानिक प्रशासनाकडून ती तपासावी.