CLOSE AD

JIO ग्राहकांना मिळणार 5000 रुपये बोनस , पहा सविस्तर माहिती

Jio Customer Bonus : मंडळी जिओकडून ५ हजार रुपयांचा बोनस मिळणार असल्याचा दावा सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. मेसेजनुसार, जिओने आपली ८ वर्षे पूर्ण केल्याच्या निमित्ताने ग्राहकांच्या खात्यात पाच हजार रुपये जमा करण्यात येणार आहेत. या दाव्यासह एक स्क्रॅच कार्ड आणि लिंक देखील शेअर केली जात आहे. मात्र आमच्या पडताळणीअंती हा दावा खोटा असल्याचं स्पष्ट झालं आहे.

या व्हायरल मेसेजमध्ये म्हटलं आहे की, जिओला ८ वर्षे पूर्ण झाल्यामुळे सर्व ग्राहकांना ५ हजार रुपयांचा बोनस दिला जात आहे. दिलेलं कार्ड स्क्रॅच करा आणि लिंक उघडून पैसे मिळवा. लाखो लोक हा मेसेज शेअर करत आहेत, त्यामुळे या दाव्याची शहानिशा करणं आवश्यक होतं.

महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी , जाणून घ्या सविस्तर माहिती

या मेसेजबाबत व्हायरल सत्य टीमने जिओ कंपनीशी संपर्क साधला असता, जिओकडून असा कोणताही बोनस दिला जात नसल्याचं सांगण्यात आलं. म्हणजेच, हा मेसेज फसवणुकीसाठी बनवलेला आहे. कंपनीने स्पष्ट केलं की त्यांनी कोणालाही अशा प्रकारचा मेसेज पाठवलेला नाही.

सायबर एक्सपर्टच्या मते, अशा लिंक्सचा उद्देश म्हणजे ग्राहकांची वैयक्तिक माहिती आणि बँक तपशील गोळा करून त्यांचा गैरवापर करणं. कोणतीही अधिकृत कंपनी पैसे ट्रान्सफरसाठी लिंक देत नाही. त्यामुळे अशा लिंक्सवर क्लिक करणं धोकादायक ठरू शकतं.

सरकार देतंय 50 हजारापर्यंत कर्ज , लगेच करा ऑनलाईन अर्ज

या सर्व बाबींच्या आधारे हे स्पष्ट होतं की जिओकडून ग्राहकांना ५ हजार रुपयांचा बोनस दिला जाणार असल्याचा दावा खोटा आहे. त्यामुळे जर तुम्हालाही असा मेसेज आला, तर तो उघडू नका किंवा त्यामधील लिंकवर क्लिक करू नका. अशी लिंक्स उघडल्यामुळे तुमचं आर्थिक नुकसान होऊ शकतं.

जास्तीत जास्त लोकांनी सावध राहावं आणि अशा भ्रामक मेसेजपासून इतरांनाही सावध करावं.

Leave a Comment