CLOSE AD

हवामान अंदाज : जुलै महिन्यात या जिल्ह्यात पडणार अती मुसळधार पाऊस

Heavy Rain Maharashtra : मित्रांनो महाराष्ट्रात शेवटी पावसाने हजेरी लावली आहे. काही भागांत चांगल्या पावसाची नोंद झाली असली तरीही अनेक भाग अजूनही समाधानकारक पावसाची वाट पाहत आहेत. विशेषता मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा जोर चांगला आहे. त्याचबरोबर कोकण, खानदेश, घाटमाथा आणि पश्चिम महाराष्ट्रातही पावसाची तीव्रता जाणवत आहे. या पावसामुळे नद्या दुथडी भरून वाहू लागल्या असून अनेक धरणांत पाण्याची पातळी वाढली आहे, जी शेतकऱ्यांसाठी एक सकारात्मक बाब आहे.

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील परिस्थिती

कोकणात अनेक भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळत आहेत. ठाणे आणि रायगड जिल्ह्यांतील चार तालुक्यांत तर अतिवृष्टी झाल्याची नोंद आहे. पुणे, सातारा, कोल्हापूर आणि नाशिकच्या पश्चिम भागांत पावसाचा जोर कधी अधिक, कधी कमी असा अनुभवास येतो आहे. त्यामुळे धरणांत पाण्याची आवकही कमी-जास्त प्रमाणात होत आहे.

लाडकी बहीण योजना : लाडक्या बहिणींच्या खात्यात जून महिन्याचा हप्ता जमा , लगेच चेक करा

हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांचा अंदाज

हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी राज्यातील आगामी पावसाबाबत महत्त्वाचा अंदाज वर्तवला आहे. त्यांच्यानुसार सध्या राज्यात सर्वत्र समान प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता नाही. पाऊस विखुरलेल्या स्वरूपात असेल, म्हणजेच काही भागांत जोरदार, तर काही ठिकाणी अगदीच कमी.

कोणत्या भागांत पावसाची शक्यता?

डख यांनी 1 आणि 2 जुलै रोजी सोलापूर, लातूर, धाराशिव आणि बीड या भागांत चांगल्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. मात्र हा पाऊस संपूर्ण जिल्ह्यात न पडता, काही निवडक भागांतच मर्यादित राहील. दुसरीकडे, कोकण आणि नाशिक विभागात सध्या जे जोरदार पावसाचे वातावरण आहे, ते पुढेही कायम राहण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.

या योजनेत फक्त 500 रुपये गुंतवा आणि मिळवा 3 लाख रुपये

समाधानकारक पावसासाठी किती वाट बघावी लागेल?

राज्यात सर्वदूर समाधानकारक पाऊस कधी पडणार, हा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. याबाबतही डख यांनी स्पष्ट केले आहे की, जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून म्हणजे 8 जुलैनंतर राज्यात सर्वदूर चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. तोपर्यंत मात्र पाऊस विखुरलेल्या स्वरूपातच राहील.

सध्या सुरू असलेला पाऊस जमिनीत ओलावा निर्माण करत आहे, जो पेरणीसाठी उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी जोरदार पावसाची वाट न पाहता, सध्या होत असलेल्या पावसावरच पीकपेरणीचं नियोजन करावं लागणार आहे. हवामानातील अनिश्चितता लक्षात घेऊन नियोजनपूर्वक पावसाचा उपयोग करणे गरजेचे आहे.

Leave a Comment