Heavy Rain Alert Maharashtra : मित्रांनो भारतीय हवामान विभागाने (IMD) महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा हवामान अंदाज वर्तवला आहे. सध्या राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाची परिस्थिती विस्कळीत असून काही जिल्ह्यांमध्ये समाधानकारक पाऊस झाला आहे, तर काही भाग अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागांत अजूनही चांगल्या पावसाची वाट पाहिली जात आहे. याउलट कोकण, घाटमाथा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये चांगल्या प्रमाणात पाऊस झाला आहे.
विदर्भातील हवामानाचा अंदाज
विदर्भातील अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये विजांसह मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याने या भागांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. दुसरीकडे बुलढाणा, अकोला, वाशीम आणि यवतमाळ या जिल्ह्यांसाठी सध्या कोणताही अलर्ट दिलेला नाही.
लाडकी बहीण योजना : लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार ? वाचा सविस्तर बातमी
मराठवाड्यातील पावसाची स्थिती
मराठवाड्याच्या काही भागांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. जालना, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. बीड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
उत्तर महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदुरबार आणि जळगाव या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असून, त्या पार्श्वभूमीवर या भागांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मागासवर्गीयांसाठी खुशखबर ! अण्णाभाऊ साठे योजनेतून मिळवा 7 लाख रुपये …….
मध्य आणि दक्षिण महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा
मध्य व दक्षिण महाराष्ट्रातील घाटमाथ्याच्या भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विशेषता पुणे, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांच्या घाटमाथा भागांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.
कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड आणि पालघर या जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याने जोरदार पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. या भागांमध्ये पुढील काही दिवस चांगल्या पावसाची शक्यता आहे.
गॅस सिलिंडर दरात मोठी घसरण , नागरिकांना झाला मोठा फायदा
नागरिक व शेतकऱ्यांसाठी सूचना
हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार नागरिकांनी, विशेषता शेतकऱ्यांनी, आवश्यक ती खबरदारी घ्यावी. शेतीच्या कामांचे नियोजन करताना हवामानाच्या बदलत्या स्वरूपाचा विचार करून योग्य तो निर्णय घ्यावा, जेणेकरून संभाव्य नुकसान टाळता येईल.