CLOSE AD

बापरे ! या शेतकऱ्यांचा सरकारी योजनेचा लाभ बंद , जाणून घ्या सविस्तर माहिती

Government Yojana Benefits Closed : शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या शासकीय योजना, अनुदान, कर्ज, पिकविमा अशा सर्व सुविधा आता Farmer ID द्वारेच मिळणार आहेत. त्यामुळे ही ओळखपत्र शेतकऱ्यांसाठी अनिवार्य ठरणार आहे. जशी सामान्य नागरिकासाठी आधारकार्ड आवश्यक आहे, तशीच शेतकऱ्यांसाठी Farmer ID ओळख म्हणून वापरली जाणार आहे.

Farmer ID का आवश्यक आहे?

शासनाच्या विविध कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी, शेतजमिनीचे व्यवहार करण्यासाठी, पिककर्ज घेण्यासाठी आणि आपत्तीमुळे नुकसान भरपाई मिळवण्यासाठी Farmer ID आवश्यक आहे. शेतकरी असल्याचा अधिकृत पुरावा म्हणून या ID ची नोंद केली जाणार आहे.

बांधकाम कामगारांना मिळणार 1 लाख रुपये , असा करा अर्ज

Farmer ID साठी लागणारी कागदपत्रे

1) आधार कार्ड
2) ७/१२ उतारा आणि ८अ
3) आधारशी लिंक असलेला मोबाईल क्रमांक
4) मोबाईल क्रमांक आधारशी लिंक नसल्यास, शेतकरी स्वतः थंब (अंगठ्याचा ठसा) देऊनही Farmer ID तयार करू शकतात

जर शेतकऱ्यांनी वेळेत आपली Farmer ID तयार केली नाही, तर त्यांना खालील योजनांपासून व सुविधांपासून वंचित राहावे लागेल.

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी चिंता वाढवणारी बातमी , पहा सविस्तर माहिती

  • पीएम किसान (PM Kisan) योजनेचा लाभ बंद
  • नमो शेतकरी योजना लागू होणार नाही
  • पिक विमा भरता येणार नाही आणि मिळणारही नाही
  • पिक कर्ज मिळणार नाही
  • धान खरेदी व बोनस बंद
  • कृषी योजनांसाठी अर्ज करता येणार नाही
  • नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास नुकसान भरपाई मिळणार नाही
  • जमीन खरेदी-विक्री करता येणार नाही
  • कर्जमाफीपासून वंचित राहावे लागेल

शेतकरी बांधवांनी कोणताही शासकीय लाभ गमावू नये यासाठी आणि भविष्यातील अडचणी टाळण्यासाठी आजच आपली Farmer ID तयार करावी. नजीकच्या CSC सेंटरमध्ये जाऊन किंवा अधिकृत पोर्टलवरूनही Farmer ID काढता येऊ शकते. सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी ही पावले त्वरित उचला.

Leave a Comment