CLOSE AD

सरकारतर्फे 100 शेळ्या आणि 5 बोकड घेण्यासाठी मिळणार 10 लाख रुपयांचे अनुदान , आजच करा अर्ज

Goat Farming Yojana : मंडळी राष्ट्रीय पशुधन अभियान अंतर्गत केंद्र सरकारने ग्रामीण पशुपालकांसाठी NLM शेळी-मेंढी पालन योजना 2025 राबवण्यास मान्यता दिली आहे. ही योजना शेळी व मेंढी पालन व्यवसायास प्रोत्साहन देऊन ग्रामीण भागातील नागरिकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आखली गेली आहे. दिनांक २० जानेवारी २०२३ रोजी या योजनेबाबतचा शासन निर्णय (GR) अधिकृतरीत्या प्रसिद्ध करण्यात आला.

योजनेचे उद्दिष्ट

या योजनेचा मुख्य उद्देश ग्रामीण आणि आदिवासी भागातील शेतकरी, स्वयंसहायता गट, बेरोजगार युवक व महिला यांना शेळी व मेंढी पालनासाठी प्रोत्साहित करणे, स्थानिक प्रजातींचे संवर्धन करणे आणि उद्योजकतेला चालना देणे हा आहे. या माध्यमातून कृषीपूरक उद्योग निर्माण होऊन ग्रामीण भागातील उत्पन्नात वाढ होईल, असा विश्वास शासनाला आहे.

मनरेगा योजनेखाली मिळणार मोफत सायकल ! असा करा ऑनलाईन अर्ज

प्रकल्प मंजुरी व निधी वितरणाची प्रक्रिया

लाभार्थ्यांनी तयार केलेले प्रकल्प राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत केंद्र शासनाकडे पाठवले जातात. हे प्रकल्प केंद्र शासनाच्या प्रकल्प मंजुरी समितीमार्फत मंजूर केले जातात.
प्रकल्प मंजूर झाल्यानंतर अनुदानाची रक्कम SIDBI (भारतीय लघु उद्योग विकास बँक) मार्फत लाभार्थ्याच्या संबंधित बँक खात्यात किंवा वैयक्तिक बचत खात्यात थेट जमा केली जाते.

परंतु, बँकेने प्रकल्पासाठी मंजूर केलेल्या कर्जापैकी किमान २५% रक्कम लाभार्थ्याला आधी वितरित केलेली असावी. हाच निकष पूर्ण झाल्यानंतर SIDBI कडून अनुदानाचा पहिला हप्ता दिला जातो.

आता जमिनीचे कागदपत्रे मिळणार व्हॉट्सॲपवर , जाणून घ्या सविस्तर माहिती

युनिट प्रमाणे प्रकल्प रचना आणि अनुदान

शेळी-मेंढी पालनासाठी लाभार्थ्यांना प्रजातींच्या संख्येनुसार विविध युनिट्स उपलब्ध आहेत. प्रत्येक युनिटमध्ये ठराविक संख्येने मादी आणि नर प्रजाती असतात. उदा. शंभर मादी व पाच नर प्राण्यांचे युनिट हे सर्वात लहान युनिट आहे. त्यासाठी दहा लाख रुपये अनुदान मिळते.

याप्रमाणे २०० मादी व १० नर प्राण्यांकरिता वीस लाख रुपये, ३०० मादी व १५ नर प्राण्यांकरिता तीस लाख रुपये, ४०० मादी व २० नर प्राण्यांकरिता चाळीस लाख रुपये, आणि कमाल ५०० मादी व २५ नर प्राण्यांकरिता पन्नास लाख रुपये अनुदान देण्यात येते.

हे सर्व प्रकल्प शेळी किंवा मेंढी यांच्या जातींवर आधारित असू शकतात. म्हणजेच लाभार्थी शेळ्यांचा किंवा मेंढ्यांचा प्रकल्प निवडू शकतो.

या योजनेअंतर्गत मिळणार मोफत पिठाची गिरणी , असा करा अर्ज

अनुदानाचा उपयोग

योजनेअंतर्गत दिले जाणारे अनुदान केवळ शेळ्या किंवा मेंढ्यांच्या खरेदीसाठी वापरता येते. या योजनेचा उद्देश प्रजातींचे संवर्धन व प्रजननाच्या गुणवत्तेचा विकास करण्याचा आहे. त्यामुळे या अनुदानाचा वापर शेळी-मेंढ्यांच्या खरेदी व संगोपनासाठीच करणे बंधनकारक आहे.

👇👇👇👇👇👇

10 लाख रुपयांचे अनुदान , आजच करा अर्ज

👆👆👆👆👆👆

लाभार्थ्यांची पात्रता

  • व्यक्तिगत शेतकरी व पशुपालक
  • महिला व युवकांचे स्वयंसहायता गट
  • सहकारी संस्था
  • कृषी उद्योजक किंवा पशुसंवर्धनावर आधारित संस्था

Leave a Comment