Fixed Deposit Interest : मंडळी फिक्स डिपॉझिट (FD) मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर सध्याचे व्याजदर आणि बँकांच्या योजना जाणून घेणे आवश्यक आहे. अलीकडे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) रेपो दरात मोठी कपात केली आहे. गेल्या काही महिन्यांत रेपो दरात एकूण 1% इतकी कपात झाली आहे. यामध्ये मागील आर्थिक वर्षाच्या शेवटी 0.25% आणि चालू आर्थिक वर्षात 0.75% कपात झाली आहे.
रेपो दर कपात आणि त्याचा परिणाम
आरबीआयने रेपो दर कपात केल्यानंतर देशभरातील अनेक बँकांनी त्यांच्या FD वर दिल्या जाणाऱ्या व्याजदरात घट केली आहे. त्यामुळे पारंपरिक बँकांमधील FD वर पूर्वीप्रमाणे आकर्षक व्याज मिळणे थोडेसे कठीण झाले आहे.
या महिलांना मिळणार मोफत पिठाची गिरणी , असा करा अर्ज
अजूनही जास्त व्याज देणाऱ्या स्मॉल फायनान्स बँका
आरबीआयच्या निर्णयाचा परिणाम मोठ्या बँकांच्या FD व्याजदरावर झाला असला, तरी काही स्मॉल फायनान्स बँका अजूनही गुंतवणूकदारांना चांगले व्याजदर देत आहेत.
युनिटी स्मॉल फायनान्स बँक ही अशा बँकांपैकी एक आहे. ही बँक 1001 दिवसांच्या FD साठी ज्येष्ठ नागरिकांना 9.10% पर्यंत व्याज देते. जर तुम्ही 60 वर्षांहून अधिक वयाचे असाल आणि तीन कोटी रुपयांपेक्षा कमी रक्कम FD मध्ये गुंतवण्याचा विचार करत असाल, तर युनिटी बँकेची योजना तुमच्यासाठी लाभदायक ठरू शकते.
फक्त एकदा गुंतवणूक करून करू शकता बक्कळ कमाई ! पहा सविस्तर माहिती
सर्वोदय स्मॉल फायनान्स बँक सुद्धा चांगले व्याजदर देते. ही बँक 30 महिने ते 3 वर्षे कालावधीच्या FD साठी सीनियर सिटीझन्सना 8.80% पर्यंत व्याज देते.
उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक दोन ते तीन वर्षे कालावधीच्या FD साठी ज्येष्ठ नागरिकांना 8.75% पर्यंत व्याज देत आहे.
सध्याच्या परिस्थितीत FD मध्ये गुंतवणूक करताना कोणत्या बँकेत अधिक व्याज मिळू शकते, याचा अभ्यास करणे आवश्यक आहे. स्मॉल फायनान्स बँका FD गुंतवणुकीसाठी चांगला पर्याय ठरू शकतात, विशेषता सीनियर सिटीझन्ससाठी. FD करण्यापूर्वी सर्व अटी व शर्ती तपासून पाहाव्यात आणि गरज असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.