Cibil Score Update : नमस्कार मित्रांनो सरकारी नोकरीसाठी अर्ज करताना केवळ चारित्र्य प्रमाणपत्र महत्त्वाचे नाही, तर तुमचा CIBIL स्कोअर (क्रेडिट स्कोअर) देखील तितकाच महत्त्वाचा ठरतोय. जर स्कोअर चांगला नसेल, तर तुम्ही निवड झाल्यानंतरही नोकरी गमावण्याची शक्यता आहे. नुकताच अशाच एका प्रकरणामुळे अनेक उमेदवारांना धक्का बसला आहे.
स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) एका उमेदवाराची नियुक्ती केवळ त्याचा खराब CIBIL स्कोअर असल्यामुळे रद्द केली. संबंधित उमेदवार, पी. कार्तिकेयन, यांनी हा निर्णय मद्रास उच्च न्यायालयात आव्हान दिलं. मात्र न्यायालयाने एसबीआयचा निर्णय योग्य ठरवून याचिका फेटाळून लावली.
गाय म्हैस शेळी साठी मिळणार इतके अनुदान , असा करा ऑनलाईन अर्ज
नेमकं काय घडलं?
एसबीआयने जुलै 2020 मध्ये चीफ बिझनेस ऑफिसर (CBO) पदासाठी भरतीची जाहिरात दिली होती. पी. कार्तिकेयन यांनी अर्ज करून सर्व परीक्षा उत्तीर्ण केल्या आणि 12 मार्च 2021 रोजी त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आलं. पण अवघ्या एका महिन्यात, 9 एप्रिल 2021 रोजी, बँकेने त्यांची नियुक्ती रद्द केली. कारण सांगताना बँकेने त्यांच्या CIBIL अहवालातील आर्थिक शिस्तीत गंभीर त्रुटी चा उल्लेख केला.
उमेदवाराची बाजू आणि न्यायालयाचा निकाल
पी. कार्तिकेयन यांनी न्यायालयात सांगितलं की जाहिरात प्रसिद्ध होताना त्यांच्यावर कोणतंही थकित कर्ज नव्हतं आणि त्यांनी आपली सर्व कर्जं वेळेत फेडली आहेत. मात्र एसबीआयने न्यायालयात स्पष्ट केलं की जाहिरातीतच नमूद केलं होतं – ज्यांचा क्रेडिट स्कोअर खराब आहे किंवा कर्ज थकबाकी आहे, ते अर्जदार पात्र मानले जाणार नाहीत.
10 वी पास विद्यार्थ्यांना मिळणार मोफत टॅबलेट , असा करा अर्ज
न्यायाधीश एन. माला यांनी निकाल देताना नमूद केलं की, केवळ कर्ज फेडणे पुरेसं नाही; कर्ज परतफेडीचा संपूर्ण इतिहास स्वच्छ असावा. उमेदवाराने नोकरीसाठी अर्ज करताना अटी मान्य केल्या आहेत, त्यामुळे नंतर त्या अटींवर आक्षेप घेता येणार नाही.
या प्रकरणातून एक महत्त्वाचा धडा मिळतो — सरकारी नोकरीसाठी अर्ज करण्यापूर्वी तुमचा CIBIL स्कोअर आणि क्रेडिट इतिहास नीट तपासून घ्या. अन्यथा, तुमचा खराब क्रेडिट रेकॉर्ड तुमच्या निवडीवर किंवा नियुक्तीवर परिणाम करू शकतो आणि स्वप्नातील नोकरी हातातून जाऊ शकते.