Best Bank For Personal Loan : नमस्कार मित्रांनो पर्सनल लोन हे हमीशिवाय दिले जाणारे कर्ज असल्यामुळे त्याचे व्याजदर तुलनेत जास्त असतात. म्हणूनच पर्सनल लोन घेण्यापूर्वी योग्य बँकेची निवड करणे आवश्यक असते. ज्या बँकेचे व्याजदर तुलनेत कमी आहेत, अशा बँकेतून कर्ज घेतल्यास परतफेड करताना आर्थिक भार कमी होतो.
बँक ऑफ महाराष्ट्रचा पर्याय
पर्सनल लोन घेण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्र हा उत्तम पर्याय ठरू शकतो. ही सरकारी बँक ग्राहकांना कमी व्याजदराने पर्सनल लोन देते. जर तुमचा सिबिल स्कोअर चांगला, म्हणजेच 800 किंवा त्याहून अधिक असेल, तर तुम्हाला फक्त 9 टक्के दराने पर्सनल लोन मिळू शकते.
विद्यार्थ्यांना 10,000 रुपये शिष्यवृत्ती मिळविण्याची संधी , पहा सविस्तर माहिती
कर्जाची अटी आणि मर्यादा
या बँकेकडून तुम्हाला तुमच्या मासिक उत्पन्नाच्या 20 पट रक्कम कर्ज म्हणून मिळू शकते. कर्जाची कमाल मर्यादा 20 लाख रुपये आहे. पर्सनल लोन घेण्यासाठी अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न किमान 3 लाख रुपये असावे लागते. या कर्जासाठी हमीदाराची गरज नसते. कर्ज घेतेवेळी कर्जाच्या रकमेच्या 1 टक्के प्रोसेसिंग फी आणि त्यावर जीएसटी भरावा लागतो.
कर्जाच्या परतफेडीचा विचार
पर्सनल लोन घेताना व्याजदराचा मोठा परिणाम तुमच्या मासिक हप्त्यावर होतो. उदाहरणार्थ, जर तुम्ही 5 लाख रुपयांचे कर्ज 5 वर्षांसाठी वार्षिक 13 टक्के दराने घेतले, तर तुमचा दरमहा हप्ता सुमारे 11,377 रुपये असेल. यामुळे एकूण व्याज म्हणून तुम्हाला जवळपास 1.82 लाख रुपये भरावे लागतील. म्हणून शक्य तितक्या कमी व्याजदरात कर्ज घेणे फायद्याचे ठरते.
पेन्शन योजनेत पुन्हा झाले मोठे बदल , जाणून घ्या सविस्तर माहिती
इतर महत्त्वाची माहिती
कधी कधी लोक त्यांच्या गरजेनुसार पीएफमधून पैसे काढण्याचा विचार करतात. अशा वेळी काही नियम आणि अटी लागू होतात. विशेषता विवाहित व्यक्तींना काही विशिष्ट कारणांसाठी पैसे काढण्याची परवानगी असते. त्यामुळे पैसे काढण्यापूर्वी त्या अटी जाणून घेणे गरजेचे आहे.