Bank Minimum Balance Cancelled : मंडळी देशातील सरकारी बँकांच्या ग्राहकांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. इंडियन बँकेनं बचत खात्यांवरील किमान शिल्लक रक्कम ठेवण्याचा नियम रद्द केला आहे. हा निर्णय 7 जुलै 2025 पासून लागू होणार आहे. यानंतर खात्यात किमान शिल्लक रक्कम न ठेवली तरी कोणताही दंड आकारला जाणार नाही.
निर्णयामागील कारणे
इंडियन बँकेनं त्यांच्या सोशल मीडिया पोस्टद्वारे हा निर्णय जाहीर केला आहे. बँकेनं स्पष्ट केलं आहे की, हा निर्णय ग्राहकांचे वित्तीय समावेशन वाढवण्यासाठी आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम बनवण्यासाठी घेण्यात आला आहे. बँकेनं आपल्या घोषणेत म्हटलं आहे, तुमचा पैसा, तुमचे नियम. म्हणजेच आता खात्यात किमान रक्कम ठेवण्याची सक्ती नाही.
या महिलांना मिळणार मोफत पिठाची गिरणी , असा करा अर्ज
ग्राहकांसाठी फायदे
या निर्णयामुळे इंडियन बँकेच्या ग्राहकांना खात्यात पैसे कमी राहिल्यास दंड भरावा लागणार नाही. सर्व बचत खात्यांवरील किमान शिल्लक रक्कम शुल्क पूर्णपणे रद्द करण्यात आलं आहे. बँकेनं नमूद केलं आहे की हा निर्णय समाजातील सर्व स्तरांतील लोकांसाठी बँकिंग सेवा अधिक सुलभ आणि किफायतशीर बनवण्यासाठी आहे. मात्र या सुविधेसाठी नियम व अटी लागू असतील.
अन्य बँकांचा अशाच प्रकारचा निर्णय
इंडियन बँकेपूर्वी काही अन्य सरकारी बँकांनीही किमान शिल्लक रक्कम शुल्क रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. स्टेट बँक ऑफ इंडियानं 2020 पासून हा नियम रद्द केला आहे. कॅनरा बँकेनं मे 2025 पासून आणि पंजाब नॅशनल बँकेनं 1 जुलै 2025 पासून किमान शिल्लक शुल्क रद्द केलं आहे.
बांधकाम कामगारांच्या मुलांना मिळणार थेट 20,000 रुपये , असा करा अर्ज
आधीची पद्धत
यापूर्वी बँकांमध्ये बचत खाते चालू ठेवण्यासाठी मासिक सरासरी शिल्लक रक्कम ठेवावी लागत होती. ही रक्कम ठेवण्यात अपयश आल्यास बँका खातेदारांकडून दंड आकारत असत. आता अनेक बँकांनी या दंडातून ग्राहकांची सुटका केली आहे.