अर्ज करण्याची प्रक्रिया
इच्छुक लाभार्थ्यांनी अर्ज करण्यासाठी खालील पत्त्यावर भेट द्यावी.
गृहनिर्माण भवन, रूम क्रमांक 33, बांद्रा (पूर्व), मुंबई – 400051
तसेच, अधिक माहितीसाठी 022-35424395 या क्रमांकावर संपर्क साधावा.
https://udyog.mahaswayam.gov.in/#/home
योजनेचे फायदे
ही योजना लाभार्थ्यांना व्यवसाय सुरू करण्यासाठी थेट आर्थिक मदत करते. कर्जासोबत अनुदानाची सुविधा मिळते. बँकांचा सहभाग कमी केल्यामुळे महामंडळाचा सहभाग वाढलेला आहे, ज्यामुळे कर्ज मिळवणे सुलभ झाले आहे.
सुधारित आर्थिक अटी आणि लाभ
पूर्वी बीजभांडवल योजनेत फक्त 5 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळत होते, परंतु आता ही मर्यादा 7 लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. बँकेचा सहभाग 75 टक्क्यांवरून 50 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे, ज्यामुळे लाभार्थ्याला अधिक मदत मिळते.
Pages: 1 2