Aadhar Card Cancelled : मंडळी अलीकडच्या काळात अनेक लोकांच्या नावावर दोन आधार क्रमांक जारी झाल्याच्या तक्रारी UIDAI कडे प्राप्त झाल्या. त्यामुळे आधार जारी करणाऱ्या संस्थेने या संदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेतले असून, एक व्यक्ती – एक आधार हे धोरण अधिक काटेकोरपणे अंमलात आणण्यासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे लागू केली आहेत. यामुळे भविष्यातील गोंधळ, फसवणूक व सरकारी योजनांचा गैरवापर टाळता येणार आहे.
कोणता आधार क्रमांक वैध मानला जाईल?
UIDAI च्या नव्या नियमानुसार, ज्या आधार क्रमांकावर व्यक्तीची संपूर्ण बायोमेट्रिक माहिती म्हणजेच अंगठ्याचे ठसे व डोळ्याचे स्कॅन नोंदवले गेले आहेत, तो आधार क्रमांक वैध मानला जाईल. जर दोन्ही आधार क्रमांकांपैकी एका क्रमांकावर अपूर्ण बायोमेट्रिक माहिती असेल, तर सर्वात आधी जारी झालेला आधार क्रमांक अधिकृत मानला जाईल. दुसरा आधार क्रमांक रद्द केला जाईल.
Fact Check : लाडक्या बहिणींना मिळणार मोफत वॉशिंग मशीन , काय आहे सत्यता ?
हे नियम का लागू केले गेले?
एका व्यक्तीच्या नावावर दोन आधार कार्ड तयार होण्याच्या घटनांमुळे विविध सरकारी योजनांमध्ये गैरवापर होण्याची शक्यता वाढली होती. यामुळे ओळख प्रणालीतील पारदर्शकता धोक्यात येत होती. UIDAI ने याची गंभीर दखल घेत, बायोमेट्रिक माहितीच्या आधारे आधार क्रमांक वैध/अवैध ठरवण्याचा निर्णय घेतला आहे.
दोन आधार क्रमांक असतील तर काय करावे?
जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्याकडे दोन आधार क्रमांक आहेत, तर लवकरात लवकर जवळच्या आधार सेवा केंद्राशी संपर्क साधा. तुमच्या दोन्ही आधार क्रमांकांची तपासणी केल्यानंतर UIDAI योग्य तो निर्णय घेईल — कोणता क्रमांक वैध ठेवायचा आणि कोणता रद्द करायचा.
प्रधानमंत्री पिक विमा योजना : १ रुपयात पीक विमा योजना बंद , पहा सविस्तर माहिती
आधारसाठी आवश्यक कागदपत्रांमध्ये बदल
UIDAI ने आधार नोंदणी आणि माहिती दुरुस्तीसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची यादी अद्ययावत केली आहे. ही यादी नागरिकांच्या विविध गटांनुसार भिन्न असणार आहे. उदाहरणार्थ लहान मुले, अनिवासी भारतीय (NRI), परदेशी नागरिक आणि ट्रान्सजेंडर व्यक्तींसाठी वेगळे निकष लागू असतील.
वैध मानले जाणारे कागदपत्रे
आधारसाठी वैध मानले जाणारे कागदपत्रांमध्ये जन्म प्रमाणपत्र, भारतीय किंवा विदेशी पासपोर्ट, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, रेशन कार्ड यांचा समावेश आहे. पत्ता पुरावा म्हणून वीज, पाणी, गॅस, किंवा टेलिफोनचे बिल ग्राह्य धरले जाईल. याशिवाय शालेय प्रमाणपत्रे आणि अन्य सरकारी प्रमाणपत्रे देखील ग्राह्य धरली जातील.
या योजनेअंतर्गत पात्र महिलांसाठी मोफत स्कुटी योजना ! असा करा अर्ज
विशेष बाबी वेगवेगळ्या गटांसाठी
पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांच्या आधार नोंदणीसाठी कुटुंब प्रमुखाचा आधार क्रमांक आवश्यक असेल. परदेशी नागरिक किंवा OCI कार्डधारकांच्या बाबतीत, त्यांच्या आधार क्रमांकाची वैधता त्यांच्या व्हिसा किंवा प्रवास परवान्याच्या कालावधीपर्यंत मर्यादित असेल.
महत्त्वाची सूचना
UIDAI ने स्पष्ट केले आहे की, कोणताही दस्तऐवज तेव्हाच वैध मानला जाईल जेव्हा तो सध्याच्या घडीला वैध असेल, व्यक्तीच्या नावावर असेल आणि त्यातील माहिती पडताळता येण्यासारखी असेल. तसेच, नाव, जन्मतारीख किंवा लिंग बदलण्यासाठी विशिष्ट आणि पुरेसे पुरावे आवश्यक असतील.
नवीन धोरणाचा उद्देश
UIDAI च्या या नव्या मार्गदर्शक तत्त्वांचा मुख्य उद्देश म्हणजे आधार माहिती अधिक सुरक्षित, अचूक आणि विश्वासार्ह बनवणे. या धोरणामुळे डुप्लिकेट आधार क्रमांक हटवले जातील आणि नागरिकांना त्यांच्या ओळखीची दुरुस्ती करण्यास अधिक मदत मिळेल.
तुमच्यासाठी पुढील पावले
जर तुमच्या नावावर दोन आधार क्रमांक असतील किंवा तुमच्या माहितीमध्ये काही बदल करायचे असतील, तर UIDAI च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन किंवा जवळच्या आधार सेवा केंद्रात भेट देऊन ते तातडीने दुरुस्त करावेत.