CLOSE AD

लाडकी बहीण योजना : लाडक्या बहिणींना स्वतःची पतसंस्था सुरु करण्याची संधी

Ladki Bahin Yojana Patsantha : मंडळी महाराष्ट्र सरकारच्या माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी आता केवळ मासिक ₹1500 इतक्याच आर्थिक सहाय्यापेक्षा अधिक संधी उपलब्ध होत आहे. राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे या महिलांना आता स्वतःची महिला सहकारी पतसंस्था सुरू करता येणार आहे.

सहकार विभागाचा महत्त्वपूर्ण निर्णय

सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी या निर्णयाची घोषणा केली असून, महिलांना अर्थसहाय्याच्या पुढच्या टप्प्यावर नेत, त्या स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न केला जात आहे. पतसंस्था सुरू करून महिला आता आपली बचत, कर्ज व्यवहार, गुंतवणूक आणि छोट्या उद्योगांच्या संधींना चालना देऊ शकतील.

सूक्ष्म सिंचन योजनेअंतर्गत मिळणार ५५ टक्के अनुदान , असा करा अर्ज

नोंदणीसाठी लागणारी पात्रता

पतसंस्था नोंदणी करताना महिलांना काही ठराविक अटींचे पालन करणे आवश्यक आहे. भौगोलिक कार्यक्षेत्रानुसार सदस्यसंख्या व भागभांडवलाची मर्यादा वेगळी ठेवण्यात आली आहे. शहरी भागात म्हणजे मुंबई व ठाणे येथे किमान 2000 सदस्य आणि ₹30 लाख भागभांडवल लागेल. तालुका पातळीवर 500 सदस्य आणि ₹5 लाख, तर ग्रामीण भागात 250 सदस्य आणि ₹1.5 लाख भागभांडवल आवश्यक आहे.

इतर महत्त्वाच्या अटी व अर्हता

पतसंस्थेच्या स्थापनेसाठी 100 टक्के केवायसी आवश्यक आहे. प्रवर्तक महिलांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसावी आणि त्या महिला व बालविकास विभागाच्या अधिकृत लाभार्थी यादीतील असाव्यात. या अटींचे काटेकोर पालन आवश्यक आहे.

पीएम किसान योजनेचे शेतकऱ्यांना वर्षाला ३६,००० रुपये मिळणार , पहा सविस्तर माहिती

सहकार्यासाठी पालक अधिकारी नेमणूक

या महिला पतसंस्थांना प्रभावीपणे चालवण्यासाठी प्रत्येक संस्थेसाठी एक पालक अधिकारी नेमण्यात येणार आहे. हे अधिकारी कर्ज व्यवहार, लेखा तपासणी, कायदेशीर सल्ला आणि सभांचे आयोजन यासारख्या बाबतीत संस्थेला आवश्यक ते मार्गदर्शन देतील.

महिला सशक्तीकरणाच्या दिशेने पाऊल

या पुढाकारामुळे महिलांना आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम बनवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पतसंस्थेच्या माध्यमातून महिला आता स्वतःचे निर्णय घेऊ शकतील, बचत व गुंतवणुकीचे नियोजन करू शकतील आणि लघुउद्योगांना चालना देऊ शकतील.

या योजनेतून नवरा बायकोला मिळणार दरमहा १०,००० रुपये , पहा सविस्तर माहिती

योजना म्हणजे एक चळवळ

सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी म्हटले आहे की, लाडकी बहीण योजना आता केवळ एका आर्थिक सहाय्यापुरती मर्यादित न राहता, ती महिला उद्योजकता व सक्षमीकरणाची चळवळ ठरणार आहे. महिलांच्या स्वप्नांना बळकटी देण्यासाठी ही योजना एक नवा अध्याय ठरणार आहे.

Leave a Comment