CLOSE AD

पोकरा योजनेत तुमचे गाव आहे का ? इथे चेक करा ऑनलाईन पद्धतीने

Pocra Yojana : शेतकरी मित्रांनो, पोकरा योजना टप्पा 2.0 सध्या महाराष्ट्रात प्रभावीपणे राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील 21 जिल्ह्यांतील 7386 गावे समाविष्ट करण्यात आली आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचं गाव या यादीत आहे का, हे तपासणे आवश्यक आहे. कारण योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना विविध अनुदान, योजनांचा लाभ आणि तांत्रिक मार्गदर्शन मिळते.

पोकरा योजना म्हणजे काय?

पोकरा योजना म्हणजे नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना. ही योजना महाराष्ट्र शासनाची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. योजनेचा मुख्य उद्देश शाश्वत शेतीचा विकास, शेतीत तांत्रिक सुधारणा करणे आणि जलसंधारण तसेच सिंचन प्रकल्प उभारणे हा आहे.

पीएम किसान योजना : या तारखेला जमा होणार पीएम किसान योजनेचा 20 वा हप्ता

तुमचं गाव पोकरा योजनेत आहे की नाही, हे तुम्ही खालील पद्धतीने सहज तपासू शकता. यासाठी मोबाईल किंवा संगणकाचा वापर करा.

1) सर्वप्रथम mahapocra.gov.in/vp या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
2) डॅशबोर्डवर Micro Level Planning पर्याय निवडा आणि त्याखालील View Report वर क्लिक करा.
3) त्यानंतर तुमचा जिल्हा, उपविभाग, तालुका आणि ग्रामपंचायत/गाव निवडा.
4) योजनेत समाविष्ट गावांची यादी तुमच्या स्क्रीनवर दिसेल.

तुमचं गाव पोकरा योजनेत समाविष्ट असल्यास खालील प्रकारचे लाभ मिळू शकतात.

  • शाश्वत शेतीसाठी तांत्रिक मार्गदर्शन
  • जलसंधारण व सिंचन प्रकल्पांचा लाभ
  • शेती सुधारणा तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण
  • शेतीसाठी अनुदानित साधनसामग्री
  • हवामान आधारित सल्ला आणि मोबाईल अ‍ॅपद्वारे माहिती

काय आहे पोस्ट ऑफिसची RD योजना ? जाणून घ्या सविस्तर माहिती

महत्त्वाचा संदेश

तुमचं गाव पोकरा योजनेत आहे का, हे आजच तपासा आणि विविध योजनांचा लाभ घेण्याची संधी वाया जाऊ देऊ नका. या योजनेच्या माध्यमातून शाश्वत शेतीसाठी आवश्यक असलेल्या सर्व सोयी-सुविधा मोफत मिळू शकतात.

तपशील पाहण्यासाठी संकेतस्थळावर भेट द्या mahapocra.gov.in/vp

Leave a Comment