High Rainfall This Area : मित्रानो राज्यात येत्या काही दिवसांत पावसाचा जोर वाढणार असून हवामान विभागाने आगामी तीन दिवसांसाठी आठ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट आणि चोवीस जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. विशेषता कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्यावर अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
कोणते जिल्हे सावध राहणार?
मुंबई, पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, नाशिक आणि सातारा हे जिल्हे गंभीर पावसाच्या दृष्टीने संवेदनशील ठरले असून, येत्या तीन दिवसांत या भागांमध्ये अतिवृष्टी होण्याचा इशारा देण्यात आला आहे. यासाठी स्थानिक प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
लाडकी बहीण योजना : लाडक्या बहिणींसाठी अदिती तटकरे यांची मोठी घोषणा , जाणून घ्या सविस्तर
देशभरात पावसाची स्थिती
फक्त महाराष्ट्रच नव्हे तर वायव्य, मध्य, पूर्व आणि ईशान्य भारतातील अनेक भागांमध्येही जोरदार पावसाचा अंदाज आहे. पश्चिम किनारपट्टीवरील गोवा, कर्नाटक तसेच गुजरात व राजस्थानच्या काही भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. या भागांतील हवामान झपाट्याने बदलणार असल्याने नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी.
वाऱ्याचा वेग आणि हवामान बदल
कोकण, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, बिहार, अंदमान आणि निकोबार बेटे, पश्चिम मध्य प्रदेश, पूर्व उत्तर प्रदेश, ओडिशा, आसाम, मेघालय, तामिळनाडू, केरळ आणि कर्नाटकातील काही भागांमध्ये वाऱ्याचा वेग ताशी ४० ते ६० किलोमीटर इतका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे समुद्रसपाटीलगतच्या भागांमध्ये विशेष दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पीएम किसान योजना : या तारखेला जमा होणार पीएम किसान योजनेचा 20 वा हप्ता
7 आणि 8 जुलै रोजी घाटमाथ्यावर अतिवृष्टी
सध्या महाराष्ट्र-कर्नाटक किनारपट्टीवर समुद्रसपाटीवर एक कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. याशिवाय पश्चिम राजस्थान आणि ईशान्य मध्य प्रदेशात वार्याची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. तसेच ईशान्य अरबी समुद्रापासून वायव्य बंगालच्या उपसागरापर्यंत कमी दाबाची पट्टी तयार झाल्याने, 7 आणि 8 जुलै रोजी मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.