CLOSE AD

विहीर खोदण्यासाठी सरकार देतंय 5 लाख रुपये ! असा करा ऑनलाईन अर्ज

Vihir Anudan Yojana : नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांच्या शेतीसाठी पाण्याची उपलब्धता वाढवण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गत आता विहीर खोदण्यासाठी मिळणाऱ्या अनुदानात वाढ करण्यात आली आहे. पूर्वी हे अनुदान चार लाख रुपये होते, ते आता पाच लाख रुपये करण्यात आले आहे. या निर्णयामुळे राज्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार असून, शेतीच्या उत्पादनात वाढ होण्यास मदत होईल.

लाडकी बहीण योजना : लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार ? वाचा सविस्तर बातमी

विहीर खोदण्यासाठी कोण पात्र ठरेल?

  • अनुसूचित जाती आणि जमातीतील कुटुंबे
  • भटक्या आणि विमुक्त जमातीतील कुटुंबे
  • दिव्यांग व्यक्ती कर्ता असलेली कुटुंबे
  • आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक
  • इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी
  • सीमांत शेतकरी (२.५ एकरपर्यंत जमीनधारक)
  • अल्पभूधारक शेतकरी (५ एकरपर्यंत जमीनधारक)

👇👇👇👇👇👇

विहीर अनुदान योजनेसाठी असा अर्ज करा

👆👆👆👆👆👆

अर्ज करताना आवश्यक अटी

1) अर्जदाराकडे किमान एक एकर सलग शेती असावी
2) पिण्याच्या पाण्यासाठी असलेल्या विहिरीपासून किमान ५०० मीटरचे अंतर आवश्यक आहे
3) दोन विहिरींमधील अंतर किमान २५० मीटर असावे
4) अर्जदाराच्या सातबारा उताऱ्यावर आधीपासून कोणतीही विहीर नसावी
5) अर्जदाराकडे मनरेगाचे वैध जॉब कार्ड असणे बंधनकारक आहे

Leave a Comment