CLOSE AD

लाडकी बहीण योजना : लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार ? वाचा सविस्तर बातमी

Ladki Bahin Yojana 2100 Rupees : मंडळी राज्यातील महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी लाडकी बहीण योजना सध्या अनिश्चिततेच्या छायेत आहे. निवडणुकीपूर्वी सरकारने या योजनेतील मासिक हप्ता ₹1500 वरून ₹2100 पर्यंत वाढवण्याचे आश्वासन दिले होते. मात्र सरकार स्थापन होऊन सहा महिने उलटले तरी वाढीव हप्त्याबाबत अद्याप कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. परिणामी, या योजनेच्या लाभार्थी महिलांमध्ये नाराजी आणि चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे.

मुख्यमंत्री आणि महसूल मंत्र्यांचे आश्वासन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात बोलताना स्पष्ट केले की, सरकारने दिलेले आश्वासन ते विसरलेले नाहीत. त्यांनी सांगितले की, राज्याची आर्थिक परिस्थिती हळूहळू सुधारत असून लवकरच महिलांना ₹2100 चा हप्ता मिळायला सुरूवात होईल.

गॅस सिलिंडर दरात मोठी घसरण , नागरिकांना झाला मोठा फायदा

त्याचप्रमाणे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील सरकार लवकरच वाढीव हप्ता देणार असल्याचे जाहीर केले आहे. मात्र हप्ता वाढीची अंमलबजावणी नेमकी कधीपासून होणार याची निश्चित तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय

महसूल मंत्री बावनकुळे यांनी महिलांबरोबरच राज्यातील शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वाच्या निर्णयांची घोषणा केली आहे. गरजू आणि गरीब शेतकऱ्यांसाठी नव्याने कर्जमाफी दिली जाणार आहे. यासोबतच, शेतातील पंपासाठी लागणाऱ्या वीजबिलात पुढील पाच वर्षांसाठी सवलत दिली जाणार आहे.

पेट्रोल डिझेल दरात मोठे बदल , जाणून घ्या आजचे नवीन दर

घरगुती वीजदरही ₹8.20 वरून ₹6 प्रति युनिटपर्यंत कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच अमरावती जिल्ह्यातील पांधन रस्त्यांसाठी विशेष निधी उपलब्ध करून देण्यात येणार असून त्यामुळे शेतकऱ्यांना शेतात ये-जा करणे सुलभ होईल.

एकीकडे महिलांना लाडकी बहीण योजनेचा वाढीव हप्ता कधीपासून मिळणार याविषयी अजूनही प्रतीक्षा करावी लागत आहे, तर दुसरीकडे शेतकऱ्यांसाठी काही दिलासादायक घोषणा करण्यात आलेल्या आहेत. मात्र या घोषणा प्रत्यक्षात केव्हा अमलात येतील, हे पाहणे गरजेचे ठरणार आहे.

Leave a Comment