Gold Rate Increase : मंडळी गेल्या काही दिवसांत सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळाल्यानंतर आता पुन्हा एकदा दर वाढले आहेत. देशांतर्गत बाजारात आज सोनं आणि चांदी दोघांच्याही किमतीत वाढ झाली आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम जवळपास १ लाख रुपयांपर्यंत पोहोचला आहे, तर चांदीनेही प्रति किलो १ लाखाचा टप्पा पार केला आहे. ही वाढ मुख्यतः जागतिक बाजारातील अस्थिरता आणि भू-राजकीय तणावांमुळे होत आहे.
शहरानुसार आजचे दर
दिल्लीमध्ये २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ८९,४४० रुपये आणि २४ कॅरेटचा दर ९७,५६० रुपये इतका आहे. मुंबई, चेन्नई आणि कोलकाता या शहरांमध्ये २२ कॅरेट सोनं प्रति १० ग्रॅम ८९,२९० रुपयांना तर २४ कॅरेट सोनं ९७,४१० रुपयांना विकले जात आहे.
लाखो पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी , लवकर मिळणार पूर्ण पेन्शन
२२ कॅरेट आणि २४ कॅरेट सोन्याचा फरक
२४ कॅरेट सोनं हे ९९.९% शुद्ध असते आणि त्याचा उपयोग प्रामुख्याने गुंतवणुकीसाठी केला जातो. दुसरीकडे, २२ कॅरेट सोनं सुमारे ९१.६६% शुद्ध असून, त्यात तांबे व चांदीसारख्या धातूंचा समावेश असतो. त्यामुळे ते अधिक टिकाऊ असून दागिन्यांच्या निर्मितीसाठी उपयुक्त ठरते.
एमसीएक्स व जागतिक बाजारातील स्थिती
मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) मध्येही आज सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. MCX वर १० ग्रॅमसाठी सोन्याचा दर ०.२३ टक्क्यांनी वाढून ९५,६९२ रुपये झाला आहे, तर चांदी ०.२० टक्क्यांनी वाढून १,०५,४४१ रुपये प्रति किलो झाली आहे. जागतिक बाजारात, COMEX वर सोन्याची किंमत ०.३१ टक्क्यांनी वाढून प्रति औंस ३२९७.९० डॉलर झाली आहे. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीच्या दरात ०.३५ टक्क्यांनी घट झाली असली, तरी भारतात ती महागली आहे.
महिलांना लखपती करीत आहे या सरकारी योजना , पहा सविस्तर माहिती
दरवाढीमागील कारणं
सोन्याच्या किमतीत चढउतार होण्यामागे अनेक जागतिक कारणं आहेत. जागतिक आर्थिक परिस्थितीतील अनिश्चितता, महागाईविषयक चिंता आणि भू-राजकीय तणाव यामुळे गुंतवणूकदार सोन्याला सुरक्षित पर्याय मानतात. त्यामुळे मागणी वाढते आणि दरही चढतात. सध्याच्या अस्थिर परिस्थितीत, सोने हे गुंतवणुकीसाठी एक विश्वासार्ह आणि स्थिर माध्यम मानले जात आहे.