Panjabrao Dakh Monsoon Update : मंडळी प्रसिद्ध हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी नवीन हवामान अंदाज जाहीर केला आहे. त्यांच्या अंदाजानुसार, महाराष्ट्रातील काही भागात लवकरच चांगल्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे, विशेषता ज्या भागांमध्ये अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही अशा जिल्ह्यांसाठी हा अंदाज दिला गेला आहे.
नगर, धाराशिव, बीड, लातूर आणि परभणी या जिल्ह्यांमध्ये अनेक भागांत अद्याप पावसाने हजेरी लावलेली नाही. मात्र डख यांनी सांगितले होते की 30 जूनपासून या भागांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. तसेच 1, 2 व 3 जुलै रोजीही पावसाचे चांगले दिवस असतील, असे ते म्हणाले.
ई-श्रम कार्ड धारकांना दरमहा मिळणार 3000 रुपये पेन्शन , असा करा अर्ज
पूर्व विदर्भात जोरदार पाऊस
नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, अकोला, वाशिम, हिंगोली, बुलढाणा आणि जळगाव या जिल्ह्यांमध्ये 1 जुलैपासून 3 जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. नागपूर, अमरावती, अकोला, वाशिम, हिंगोली आणि बुलढाणा येथेही पाऊस जोरदार राहणार आहे.
मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील परिस्थिती
जालना, संभाजीनगर (औरंगाबाद) आणि सोलापूरसारख्या मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये देखील पाऊस होण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रात 30 जूनपासून पावसाचा हळूहळू जोर वाढेल, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. सोलापूर जिल्ह्यातील अनेक भागांत चांगला पाऊस होईल.
सोने खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर ! सोन्याच्या दरात झाली मोठी घसरण
आगामी पंधरवड्यासाठी राज्यव्यापी अंदाज
डख यांनी सांगितले की 6 जुलैच्या आसपास राज्यात पुन्हा एकदा पावसाची लाट येईल. त्यानंतर 10 ते 15 जुलैदरम्यान देखील राज्यात पावसाचे सक्रिय वातावरण राहील. संपूर्ण राज्यात सलग 15 ते 20 दिवस पावसाचा खंड येण्याची शक्यता अत्यंत कमी आहे, असा दिलासादायक अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.
टीप — हवामान अंदाज बदलू शकतो. शेतकऱ्यांनी योग्य नियोजन करताना स्थानिक हवामान खात्याच्या सूचनांचे पालन करावे.