Driving Licence मित्रांनो आजच्या काळात वाहन चालवण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्स असणे अत्यंत आवश्यक आहे. लायसन्सशिवाय वाहन चालवणे हा कायद्याने गुन्हा असून, त्यासाठी दंड भरावा लागू शकतो. त्यामुळे प्रत्येक वाहनचालकाकडे वैध लायसन्स असणे गरजेचे आहे.
लायसन्स मिळवण्याची प्रक्रिया आता ऑनलाईन
पूर्वी ड्रायव्हिंग लायसन्ससाठी RTO कार्यालयात जावे लागत असे, पण आता ही प्रक्रिया ऑनलाइन उपलब्ध आहे. यामुळे वेळ आणि मेहनत दोन्ही वाचते. तुम्ही घरबसल्या लायसन्ससाठी अर्ज करू शकता.
ई-श्रम कार्ड धारकांना दरमहा मिळणार 3000 रुपये पेन्शन , असा करा अर्ज
लर्निंग लायसन्स म्हणजे काय?
ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी पहिला टप्पा म्हणजे लर्निंग लायसन्स मिळवणे. दुचाकी किंवा चारचाकी कोणतेही वाहन चालवायचे असल्यास, सर्वप्रथम लर्निंग लायसन्स आवश्यक आहे.
लर्निंग लायसन्ससाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा?
1) https://sarathi.parivahan.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
2) तुमचे राज्य म्हणजेच महाराष्ट्र निवडा.
3) Apply for Learner Licence हा पर्याय निवडा.
4) अर्जामध्ये तुमची सर्व माहिती भरावी.
5) आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि सुमारे ₹250 इतके शुल्क ऑनलाइन भरा.
6) अर्ज सबमिट केल्यानंतर तुम्हाला ऑनलाइन परीक्षेसाठी लिंक मिळते.
सोने खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर ! सोन्याच्या दरात झाली मोठी घसरण
लर्निंग लायसन्ससाठी ऑनलाइन परीक्षा
लर्निंग लायसन्ससाठीची परीक्षा आता तुम्ही घरूनच देऊ शकता. या परीक्षेत एकूण १५ प्रश्न विचारले जातात, जे वाहतूक नियम, रस्ता चिन्हे आणि सिग्नल्स यावर आधारित असतात. परीक्षेसाठी आधार कार्ड तुमच्या मोबाईल क्रमांकाशी लिंक असणे आवश्यक आहे.
परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्हाला लगेचच ऑनलाइन लर्निंग लायसन्स मिळते, जे तुम्ही प्रिंट करून वापरू शकता.
श्रीमंत करणाऱ्या पोस्ट ऑफिसच्या 4 बेस्ट स्कीम , जाणून घ्या सविस्तर माहिती
परमनंट ड्रायव्हिंग लायसन्स कसा मिळतो?
लर्निंग लायसन्स मिळाल्यानंतर किमान 30 दिवसांनी तुम्ही परमनंट ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करू शकता. यासाठी RTO कार्यालयात जाऊन प्रत्यक्ष वाहन चालवण्याची चाचणी द्यावी लागते. ही चाचणी यशस्वीरीत्या दिल्यानंतर, परमनंट लायसन्स तयार होतो आणि तो थेट पोस्टाने तुमच्या घरी पाठवला जातो.
ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्याची संपूर्ण प्रक्रिया आता सोपी, पारदर्शक आणि ऑनलाइन झाली आहे. कोणत्याही एजंटकडे न जाता, तुम्ही स्वतःच घरबसल्या अर्ज करू शकता. फक्त आवश्यक माहिती आणि कागदपत्रे तयार ठेवा, आणि लायसन्स मिळवा सहजपणे.