Gold Rate Decrease Big News : मंडळी सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी मागील आठवड्यात मोठी आनंदाची बातमी आली आहे. सोन्याच्या किमतीत लक्षणीय घट झाल्यामुळे आता सोनं खरेदी करणं अधिक परवडणारं झालं आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) आणि देशांतर्गत बाजारात सोन्याचे दर कमी झाले आहेत.
मल्टी कमोडिटी एक्सचेंजवरील सोन्याचे दर
गेल्या आठवड्यात MCX वर २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ९९,१०९ रुपये होता. मग हा दर कमी होऊन ९५,५२४ रुपयांवर आला आहे. म्हणजेच एका आठवड्यात सोन्याच्या दरात तब्बल ३,५८५ रुपयांची घट झाली आहे. हे दर सोन्याच्या आतापर्यंतच्या उच्चांकापेक्षा ५,५५४ रुपयांनी कमी आहेत.
लाडकी बहीण योजना : लाडक्या बहिणींचा हप्ता जमा झाला का ? लगेच चेक करा
देशांतर्गत बाजारातील दर
इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या आकडेवारीनुसार, देशांतर्गत बाजारातही सोन्याच्या किमतीत घट झाली आहे. सध्या २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ९५,७८० रुपये आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत ही किंमत २,९११ रुपयांनी कमी आहे. इतर शुद्धतेनुसार दर पुढीलप्रमाणे आहेत:
- २२ कॅरेट — ९३,४९० रुपये प्रति १० ग्रॅम
- २० कॅरेट — ८५,२५० रुपये प्रति १० ग्रॅम
- १८ कॅरेट — ७७,५९० रुपये प्रति १० ग्रॅम
या महिलांना मिळणार मोफत शिलाई मशीन आणि 15000 रुपये , असा करा अर्ज
सोने खरेदी करताना काय लक्षात ठेवावे?
सोने खरेदी करताना केवळ दर पाहून निर्णय घेऊ नये. या दरांवर ३ टक्के जीएसटी आणि मेकिंग चार्जेस वेगळे लागतात, त्यामुळे अंतिम किंमत जास्त होते. दागिन्यांची शुद्धता तपासण्यासाठी दागिन्यांवरील हॉलमार्क नक्की पहा.
सोन्याचे दर कसे तपासाल?
तुमच्या शहरातील ताजे दर जाणून घेण्यासाठी ८९५५६६४४३३ या क्रमांकावर मिस्ड कॉल द्या. काही वेळातच तुम्हाला एसएमएसद्वारे माहिती मिळेल. याशिवाय, ibjarates.com या अधिकृत वेबसाइटवर जाऊनही दर तपासता येतात.