CLOSE AD

बापरे ! जुलै महिन्यात बँकेला एवढ्या दिवस सुट्ट्या , पहा सविस्तर माहिती

Bank Holiday : मंडळी जर तुमचं काही काम बँकेत असेल, किंवा तुम्हाला वारंवार बँकेत जावं लागत असेल, तर जुलै महिन्यातील बँकांच्या सुट्ट्यांची माहिती असणे आवश्यक आहे. कारण या सुट्टीच्या दिवशी तुम्ही बँकेत गेलात, तर तुमचं काम होणार नाही. त्यामुळे या महिन्यात बँका कोणत्या दिवशी बंद असतील हे आधीच जाणून घेणे महत्वाचे आहे.

राज्यातील बँक ग्राहकांसाठी ही महत्वाची सूचना आहे – जर बँकेत काही महत्वाची कामे असतील, तर ती या सुट्ट्यांपूर्वीच पूर्ण करून घ्या. चला, जुलै महिन्यात बँकांना कोणत्या तारखांना सुट्टी असणार आहे, याची सविस्तर माहिती पाहूया.

लाडकी बहीण योजना : लाडक्या बहिणींचा हप्ता जमा झाला का ? लगेच चेक करा

जुलैमध्ये बँक सुट्ट्या का असणार?

जुलै महिन्यात दुसरा आणि चौथा शनिवार तसेच सर्व रविवारी बँका बंद असणार आहेत. याशिवाय काही राज्यांमध्ये सण आणि उत्सव यांमुळे स्थानिक सुट्ट्या असू शकतात. भारतीय रिझर्व बँकेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सार्वजनिक क्षेत्रातील आणि खाजगी बँका सणाच्या दिवशी बंद राहतात.

जुलै २०२५ मधील बँक सुट्ट्यांची यादी

  • 6 जुलै (रविवार)
  • 12 जुलै (दुसरा शनिवार)
  • 13 जुलै (रविवार)
  • 20 जुलै (रविवार)
  • 26 जुलै (चौथा शनिवार)
  • 27 जुलै (रविवार)

या महिलांना मिळणार मोफत शिलाई मशीन आणि 15000 रुपये , असा करा अर्ज

याशिवाय, महाराष्ट्रातील बँकांना या व्यतिरिक्त कोणतीही सुट्टी नाही. मात्र इतर राज्यांमध्ये स्थानिक सणांनुसार वेगवेगळ्या सुट्ट्या असू शकतात, त्यामुळे त्या त्या राज्यानुसार खात्री करून घ्या.

महत्वाची सूचना

बँकेत काही महत्वाचे व्यवहार, जसे की कर्ज कागदपत्रे, धनादेश व्यवहार किंवा इतर कामे असतील, तर ती या सुट्ट्यांपूर्वीच पूर्ण करा. इंटरनेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंग सेवा या सुट्टीच्या दिवशीही सुरू राहतील.

Leave a Comment