HDFC Mutual Fund : मंडळी एचडीएफसी म्युच्युअल फंडाने एप्रिल २०२३ मध्ये सुरू केलेल्या एचडीएफसी निफ्टी स्मॉलकॅप २५० इंडेक्स फंड आणि एचडीएफसी निफ्टी मिडकॅप १५० इंडेक्स फंड या योजना आजही गुंतवणूकदारांमध्ये लोकप्रिय आहेत. या योजनांनी भारतीय शेअर बाजारातील लहान आणि मध्यम कंपन्यांमधील गुंतवणुकीला चालना दिली आहे.
एचडीएफसी निफ्टी स्मॉलकॅप २५० इंडेक्स फंड हा भारतातील २५१व्या ते ५००व्या क्रमांकाच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतो. स्मॉलकॅप कंपन्या वाढीच्या सुरुवातीच्या टप्प्यात असतात, त्यामुळे मोठ्या परताव्याची शक्यता अधिक असते. या फंडाने लाँचपासून ४७.३२% परतावा दिला असून मागील एका वर्षातील सरासरी परतावा २५.९३% इतका आहे.
हा फंड जोखीम पत्करणाऱ्या आणि दीर्घकालीन गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर आहे. विशेषता, ३ वर्षे किंवा त्याहून अधिक काळासाठी गुंतवणूक करण्याची तयारी असलेल्यांनी या फंडाचा विचार करावा.
एचडीएफसी निफ्टी मिडकॅप १५० इंडेक्स फंड हा १०१व्या ते २५०व्या क्रमांकाच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतो. मिडकॅप कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची क्षमता असते, त्यामुळे लार्ज-कॅप कंपन्यांच्या तुलनेत अधिक परतावा मिळण्याची शक्यता असते. या फंडाने लाँचपासून ४१.३५% परतावा दिला असून मागील एका वर्षातील सरासरी परतावा २३.६०% इतका आहे. कमी जोखीम घेऊन तुलनेने स्थिर परतावा मिळवू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी हा फंड चांगला पर्याय आहे.
जर गुंतवणूकदाराला जास्त जोखीम पत्करून मोठा परतावा मिळवायचा असेल, तर स्मॉलकॅप फंड हा चांगला पर्याय ठरू शकतो. परंतु जोखीम मर्यादित ठेवून तुलनेने स्थिर परतावा मिळवू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी मिडकॅप फंड अधिक योग्य आहे. सध्या दोन्ही योजना चांगला परतावा देत आहेत, त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गरजा आणि जोखीम सहनशक्तीचा विचार करावा.