CLOSE AD

Bank Repo Rate : होम , कार आणि वैयक्तीक लोन चा ईएमआय कमी होणार , वर्षाला 10 हजार रुपयांची बचत होणार

Bank Repo Rate : मंडळी भारतीय रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी रेपो दरात 0.25 टक्के म्हणजेच 25 बेसिस पॉईंट्सने कपात करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता रेपो दर 6.50 टक्क्यांवरून 6.25 टक्के झाला आहे. या निर्णयामुळे कर्जाचे व्याजदर कमी होणार असून गृहकर्ज, कार कर्ज आणि वैयक्तिक कर्जाच्या हप्त्यांमध्ये घट होईल. महागाईच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांना याचा थोडासा दिलासा मिळू शकतो.

रिझर्व्ह बँकेच्या मॉनेटरी पॉलिसी कमिटीच्या बैठकीनंतर हा निर्णय जाहीर करण्यात आला. जवळपास पाच वर्षांनी प्रथमच रेपो दरात घट झाली आहे, त्यामुळे कर्ज घेणाऱ्या नागरिकांना मोठा फायदा होणार आहे.

रेपो दर कपातीमुळे बँका त्यांच्या कर्जावरील व्याजदरही कमी करतील. परिणामी गृहकर्ज, कार कर्ज, वैयक्तिक कर्ज आणि इतर कर्जांच्या हप्त्यांमध्ये घट होईल. त्यामुळे ज्या लोकांना नवीन कर्ज घ्यायचे आहे, त्यांना आता कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध होणार आहे.

जर एखाद्याने 5 लाख रुपयांचे वैयक्तिक कर्ज 12 टक्के व्याजदराने घेतले असेल आणि त्याचा कालावधी 5 वर्षांचा असेल, तर रेपो दर कपातीनंतर व्याजदर 11.75 टक्के होईल. त्यामुळे त्याचा मासिक हप्ता (EMI) 11,122 रुपयांवरून 11,059 रुपयांपर्यंत खाली येईल आणि वार्षिक बचत सुमारे 756 रुपये होईल.

याचप्रमाणे जर एखाद्याने 10 लाखांचे कार कर्ज 9 टक्के व्याजदराने घेतले असेल आणि ते 7 वर्षांत फेडायचे असेल, तर आता व्याजदर 8.75 टक्के होईल. त्यामुळे EMI 16,089 रुपयांवरून 15,962 रुपयांपर्यंत खाली येईल, आणि वार्षिक बचत 1,524 रुपये होईल.

गृहकर्जासाठीही मोठा दिलासा मिळणार आहे. जर एखाद्याने 50 लाख रुपयांचे गृहकर्ज 25 वर्षांसाठी घेतले असेल आणि त्याचा व्याजदर 9 टक्के असेल, तर रेपो दर कपातीनंतर हा व्याजदर 8.75 टक्के होईल. त्यामुळे त्याचा मासिक हप्ता 41,916 रुपयांवरून 41,107 रुपयांपर्यंत खाली येईल, आणि वार्षिक बचत 10,236 रुपये होईल.

या निर्णयामुळे नागरिकांना आर्थिक दिलासा मिळेल आणि कर्ज घेण्याची संधी वाढेल. त्यामुळे गृहकर्ज, वाहन कर्ज आणि वैयक्तिक कर्ज घेण्याचा विचार करणाऱ्या लोकांसाठी हा निर्णय फायदेशीर ठरू शकतो.

Leave a Comment