Crop Insurance : मंडळी नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देणारी महत्त्वाची बातमी आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत रब्बी हंगामातील पिकांचे मंजूर क्लेम शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. विशेषता हरभरा, कांदा अशा पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ही रक्कम मिळत आहे.
माझा पीक विमा मंजूर झाला आहे का?
अनेक शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न निर्माण होतो की, माझा क्लेम मंजूर झाला आहे का? किंवा पैसे खात्यात का आले नाहीत? हे तपासण्यासाठी तुम्ही घरबसल्या मोबाईल किंवा संगणकावरूनच ऑनलाईन तपासणी करू शकता.
1 जुलै पासून होणार वीज बिलात मोठी कपात , जाणून घ्या सविस्तर माहिती
पीक विमा स्टेटस ऑनलाईन कसे तपासावे?
1) तुमच्या मोबाईल किंवा संगणकावर pmfby.gov.in हे अधिकृत संकेतस्थळ उघडा.
2) Farmer Corner हा पर्याय निवडा.
3) नोंदणीकृत शेतकरी असल्यास Login for Farmer वर क्लिक करून मोबाईल क्रमांक व OTP टाकून लॉगिन करा. नवीन शेतकरी Guest Farmer या पर्यायाचा वापर करू शकतात.
4) लॉगिन केल्यानंतर डॅशबोर्डवर वर्ष आणि हंगाम निवडा (उदा. 2024 रब्बी).
5) तुमची पॉलिसी दिसेल. पॉलिसीवर क्लिक करून पिकाचे नाव, विमा कंपनी, पॉलिसी स्टेटस (Approved / Pending) पाहता येईल.
6) Claim Details मध्ये मंजूर रक्कम, मंजूरी दिनांक, UTR नंबर आणि पेमेंट स्टेटस (Payment Success) तपासता येईल.
सरकारकडून मोफत भांडी संच मिळविण्यासाठी असा करा अर्ज
मागील हंगामांचे आणि वर्षांचे तपशील कसे पाहावेत?
या पोर्टलवर तुम्ही मागील वर्षांतील किंवा खरीप-रब्बी अशा कोणत्याही हंगामातील पीक विमा तपशील पाहू शकता. वर्ष आणि हंगाम निवडून माहिती मिळवता येते.
बँक खात्याशी आधार संलग्न असणे महत्त्वाचे
शेतकऱ्यांनी खात्री करावी की त्यांचे बँक खाते आधारशी संलग्न आहे. अन्यथा विमा रक्कम जमा होण्यात अडचण येऊ शकतात.
इतर सुविधा
काही राज्यांमध्ये शेतकऱ्यांना व्हॉट्सॲपद्वारेही पीक विमा स्टेटस मिळवता येऊ शकते. यासाठी स्थानिक कृषी विभागाकडून किंवा विमा एजंटकडून अधिक माहिती घ्यावी.